दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सत्य परिस्थितीमुळे अनेक वाद निर्माण झाले. पण या सगळ्यावर मात करत चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता एका कार्यक्रमानिमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठं विधान केलं आहे.

विवेक यांनी एक नवा उपक्रम करण्याचा प्रयत्न करत ‘साउंड्स ऑफ द कश्मीर फाइल्स’ नावाचा एक म्युझिकल कार्यक्रम लाँच केला. एका थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कश्मीरी पंडित यांच्या दोन महत्त्वपूर्ण कथा पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या आवाजामध्ये प्रेक्षकांनी ऐकायल्या. यावेळी थिएटरमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले होते. याबाबत खुद्द विवेक यांनीच खुलासा केला आहे. तसेच त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – “इतर चित्रपटांचं प्रमोशन करतील पण माझ्या…”, कंगना रणौतने अक्षय कुमार, अजय देवगणला सुनावलं

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कोणता निर्णय घेतला?
“द कश्मीर फाइल्स माझ्यासाठी फक्त एक चित्रपट नाही तर एक मिशन आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांवर झालेला अन्याय आम्ही प्रत्येक कलेमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाला घेऊन ‘साउंड्स ऑफ द कश्मीर फाइल्स’ नावाचा म्युझिकल थिएटर कार्यक्रम करत नवा प्रयोग केला. अजूनही नव्या कलेच्या माध्यमातून आम्ही हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. पण काश्मीरमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.” असं विवेक यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितलं.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या लेकाचं सोशल मीडियावर कमबॅक, आर्यनने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’ वर काम करायला सुरुवात केली आहे. ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे.

Story img Loader