अभिनेत्री कल्की कोचलीन आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी नुकताच घटस्फोट घेतला. मात्र, तरीही आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू, अशी तिला आशा आहे.
आम्ही अजूनही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही दोघही समजूतदार आहोत आणि एकमेकांचा आम्ही आदर करतो. आम्ही एकत्र काम करू अशी मला अपेक्षा आहे, असे कल्की म्हणाली. तिच्या आयुष्याबद्दल सतत प्रश्न विचारले गेले असता ती म्हणाली की, माझे खासगी आयुष्य माझ्यासाठी आता वैयक्तिक झाले आहे.तुमचे आयुष्य कधीही सार्वजनिक होऊ शकत नाही हे मी शिकले आहे. माझ्या खासगी आयुष्यात मी नेहमीच उघड राहिले आहे. पण त्यामुळे बरेचजण दुखावले जातात. त्यामुळे काहीही न बोलणे हेच योग्य आहे असे मला वाटते.
सध्या कल्की तिच्या आगामी ‘हॅप्पी एन्डिंग’च्या प्रसिद्धीत व्यस्त आहे.

Story img Loader