निर्माता संजय लीला भन्साळी सध्या भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम हिच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेरी कोमची मुख्य भूमिका साकारत आहे. मेरी कोम हिच्या जीवनातील अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांचे चित्रण असणाऱ्या या चित्रपटाच्या सेटवर नुकतेच विवाहाच्या दृश्यांचे चित्रण करण्यात आले. मेरी कोम हिच्या विवाहाचा क्षण उभा करण्यासाठी प्रियांकाने शुभ्र रंगाचा ‘वेडिंग गाऊन’ परिधान केला होता. यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियांकाने अशाप्रकारे ‘वेडिंग गाऊन’ परिधान केला होता.  
प्रियांकाने या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपवले. चित्रपटाबद्दल ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना या चित्रपटातील प्रत्येक दृश्य चित्रीत करतानाचा अनुभव प्रेरणादायी होता. मेरी कोमची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. परंतु; संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे हा चित्रपट करणे शक्य झाल्याचे प्रियांकाने म्हटले आहे.  

Story img Loader