स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभव आणि अंजीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झालीय. लग्नाची धामधूम सुरु असताना एक नवा ट्विस्ट मालिकेत येणार आहे. ऐन मुहूर्तावर वैभवची प्रेयसी अवनी लग्नमंडपात अवतरणार आहे. त्यामुळे वैभवचं लग्न नेमकं अंजीशी होणार की अवनीशी याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहकुटुंब सहपरिवार मध्ये आपल्या दीराचं म्हणजे वैभवचं अंजीवर प्रेम आहे असा सरिताचा गैरसमज झाला होता. सगळे मानापमान विसरुन तिने मामीकडे अंजीसाठी लग्नाची मागणीही घातली. मामीच्या सर्व जाचक अटीही मान्य केल्या. मात्र वैभवचं अंजीवर नाही तर अवनीवर प्रेम आहे ही गोष्ट सरिताच्या लक्षात आली आणि तिने अवनीच्या स्थळासाठी सर्जेरावांकडे विचारणा केली. मात्र सर्जेरावांनीही सरिताचा अपमानच केला इतकंच नाही तर सरितावर हातही उचलला.

वहिनाचा अपमान वैभवला सहन झाला नाही आणि त्याने अंजीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाच्या मुहुर्तावर अवनीच्या एण्ट्रीने आलेला हा ट्विस्ट सर्वांच्याच भुवया उंचावणार आहे. त्यामुळे मोरे कुटुंबात नेमका कुणाचा गृहप्रवेश होतो हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding scenes in sah kutumb sah parivar marathi serial ssv