दर आठवड्याप्रमाणे या आठवड्याचीही टीआरपी रेटिंग यादी पुन्हा एकदा समोर आली आहे. पहिल्या पाच मालिकांमध्ये झी मराठी वाहिनीनेच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे ‘तुला पाहते रे’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या दोन्ही मालिकांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे. पण विक्रांत सरंजामेची फिल्मी स्टाइल प्रेमकहाणी राधिका आणि गुरुनाथ यांच्या युद्धासमोर फिकी पडली आहे. त्यामुळे टीआरपी यादीत पहिल्या स्थानावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका तर दुसऱ्या स्थानी ‘तुला पाहते रे’ ही मालिका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवड्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर आली आहे. गेल्या आठवड्यात ती दोन नंबरवर होती. तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ याही वेळी चौथ्या नंबरवर आहे. अनाजी आणि सोमाजीचं पन्हाळ्यावर शंभूराजांना अटक करायला जाणं, चांगलंच गाजलं. या मालिकेतले सगळेच कलाकार इतिहासच उभा करतात. संभाजी महाराजांचा इतिहास अनेकांना नव्यानं कळतोय. त्यामुळे या मालिकेनं आपलं स्थान अबाधित ठेवलंय.

वाचा : अंकिता लोखंडे लवकरच अडकणार विवाहबंधनात 

गेल्या वेळी चला हवा येऊ दे हा शो पाचव्या स्थानावर होता. तसा याही वेळी आहे. या शोमधल्या सर्वच कलाकारांची भन्नाट अदाकारी सगळ्यांना खिळवून सोडते. पुन्हा या आठवड्यात झी मराठीवरच्या कलाकारांनी शोमध्ये हजेरी लावली होती. तेही प्रेक्षकांना आवडलं.