‘घर म्हणजे काय’, ‘आपली माणसं म्हणजे काय’ असे अनेक प्रश्न विचारणारा आणि त्यांची उत्तर देणारा ‘वेलकम होम’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुरता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तसेच चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.

चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक,सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

उत्तम आणि आशय संपन्न कथानकाला नेत्रसुखद दृश्य, श्रवणीय संगीत, संयत आणि सकस अभिनयाची जोड मिळाल्याचं या ट्रेलरमधून पहायला मिळतं. आजवर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी अनेक चित्रपट केले असले, तरी हा चित्रपटाची जातकुळी काहीशी वेगळी असल्याचं या ट्रेलरवरून जाणवतं. त्यामुळेच या चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome home marathi movie trailer is out