एका पाठोपाठ धमाकेदार सिनेमांनंतर लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. `वेलकम जिंदगी’ या सिनेमातून स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र येताहेत. अजित साटम प्रस्तुत या सिनेमाचा मुहूर्त १ सप्टेबर रोजी मुंबईतील गणेश गल्ली येथे बाप्पाच्या शुभाशीर्वादाने करण्यात आला. यावेळी सिनेमातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. `वेलकम जिंदगी’ या सिनेमाची निर्मिती अजित साटम, संजय अहलुवालिया, बिभास छाया यांनी केली असून या सिनेमाचे दिग्दर्शन ऊमेश घाडगे यांनी केले आहे. मराठी रसिकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार असून त्यांची ही धमाल जोडी रसिकांचे धमाकेदार मनोरंजन करण्यासाठी येताहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome zindagi muhurt