सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आज भाजपात प्रवेश करुन आपल्याला आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपात प्रवेश करताना त्यांनी जय श्रीरामचा नाराही दिला आहे. अनुराधा पौडवाल या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतल्या प्रसिद्ध गायिका आहेत. तसंच त्यांनी अनेक भक्तिगीतंही गायली आहेत.

काय म्हटलं आहे अनुराधा पौडवाल यांनी?

“जय श्रीराम! मी आज भाजपाची सदस्य झाली आहे. मला आज खूप आनंद झाला आहे. कारण मी आज त्या सरकारशी जोडली गेले आहे ज्या सरकारचं नातं सनातन धर्माशी आहे. मागच्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी भक्तिगीतं गातं आहे. सुरुवातीला मी सिनेसृष्टीतही गायले, त्यानंतर मी भक्तिगीतंच म्हणते आहे. मला अनेकदा वाटायचं की मी घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य. मात्र समाधान या गोष्टीचं आहे की रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे पाच मिनिटांसाठी गाणं म्हणता आलं. त्यामुळे माझा निर्णय योग्यच होता.”

Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”
RSS Chief Mohan Bhagwat sambhal and ajmer mosque
Sambhal to Ajmer: ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज काय?’ मोहन भागवतांच्या आवाहनानंतरही संभल, अजमेर का घडत आहे?
Eknath Shinde
Deepak Kesarkar : शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीला वेग; भाजपाकडून पाहणी, शिवसेनेत नाराजी? नेते म्हणाले, “मोठा भाऊ…”
diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”

“गंगा नदीची आरती माझ्याच आवाजातली आहे जी सकाळ-संध्याकाळ होते. या सगळ्या भक्ति गीतांवर कळस चढवण्याचं काम रामलल्लासमोर म्हटलेल्या भजनामुळे झालं. मला त्यावेळी खूप समाधानी वाटलं कारण माझं स्वप्न पूर्ण झालं. मी भाजपात आले हे माझं भाग्य आहे तुम्हा सगळ्यांचे आभार असं अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं आहे.”

सुप्रसिद्ध गायिका आहेत अनुराधा पौडवाल

अनुराधा पौडवाल या हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी गाणं म्हणणाऱ्या उत्तम पार्श्वगायिका आहेत. मात्र मागील ३५ वर्षांपासून त्या भक्तिगीतं गात आहेत. टी सीरिज या गुलशन कुमार यांच्या कंपनीत त्या गाऊ लागल्या आणि त्यानंतर त्यांनी भक्ति गीतंच गायली. कॅसेटचा जमाना होता त्या काळात अनुराधा पौडवाल या भक्ति गीतांसाठीच ओळखल्या जात. अनुराधा पौडवाल यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. आपल्याला राम मंदिरात गाणं म्हणायची संधी मिळाली याचं आंतरिक समाधान आहे असंही त्यांनी आज म्हटलं आहे.

Story img Loader