गायिका मैथिली ठाकूर ही सोशल मिडियावर आपल्या सुमधुर आवाजाने प्रत्येकालाच भारावून टाकत असते. सोशल मिडियावर सक्रिय राहत ती नवनवीन गाणी तसेच तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी शेअर करत असते. नुकताच विमान प्रवासादरम्यान तिला एक वाईट अनुभव आलं. त्या अनुभवाबद्दल ती सोशल मिडियावर व्यक्त झाली आहे. सामानाच्या वजनावरून अर्धा तास तिला चुकीची वागणूक देण्यात आली.
आणखी वाचा : ऐश्वर्या रायला तृषा कृष्णन पडली भारी, जाणून घ्या नेमकं काय घडलं
“दिवसाची सुरुवात ६E-२०२२ या विमानातून पाटणा येथे प्रवास करताना सर्वात वाईट अनुभवाने झाली. जीएस तेजेंदर सिंह अतिशय उद्धटपणे वागले. त्यांचे हे वागणे अजिबात अनपेक्षित होते. आजच्या या वागण्याने मी पुन्हा त्याच विमान कंपनीने प्रवास करायचा की नाही असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे,” असे ट्विट करत तिने इंडिगो या विमानकंपनीला टॅग केले.
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी मैथिली ठाकूरसोबत सामानाच्या वजनामुळे गैरवर्तन केल्याचे तिने सांगितले. “जीएस तेजेंद्र सिंह अतिशय उद्धटपणे वागले. आजच्या असभ्य वागणुकीमुळे मी आता या विमान कंपनीने प्रवास करायचा की नाही?”, असा प्रश्न मैथिलीने ट्विटमध्ये केला आहे. आज पहाटे एका कार्यक्रमासाठी ती दिल्लीहून पाटण्याला जात होती. दिल्ली विमानतळावर इंडिगोचा कर्मचारी तेजेंदर सिंह याने गैरवर्तन केले, असा आरोप मैथिली ठाकूरने केला आहे.
मैथिलीबरोबर जे सामान होते त्या सामानामध्ये तिचे कपडे आणि वाद्ये होती. हे पाहून तिला विमानतळावर अडवण्यात आले. यावेळी अनेकांनी सेल्फी काढण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांचे वागणे पाहून लोकांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, ती सेलिब्रिटी आहे तिला जाऊ द्या. परंतु, फ्लाइट कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. तुम्ही सेलिब्रिटी आहात तर काय झाले? असे उत्तर त्यांनी दिले. हा सगळा प्रकार मैथिलीसाठी लज्जास्पद होता. कर्मचाऱ्यांनी तिला दिलेली वागणूक पूर्णपणे चुकीची होती असा खुलासा तिने केला. कारण, कर्मचाऱ्यांची वागणूक अत्यंत चुकीची होती. सामानाच्या वजनावरून अर्धा तास छळ करण्यात आला.