लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हीच विजयगाथा ’83’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग यामध्ये तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटात एका वेस्ट इंडीज खेळाडूच्या मुलाचीही वर्णी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ’83’ या चित्रपटात वेस्ट इंडीज खेळाडू माल्कम मार्शल यांचा मुलगा माली झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान याविषयी म्हणाला, ‘माल्कम मार्शल यांची भूमिका साकारण्यासाठी माली मार्शलने होकार दिला आहे. तो फक्त वडिलांसारखा दिसतच नाही तर त्याची फलंदाजीसुद्धा थोडीफार त्यांच्यासारखीच आहे.’

या चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केलेल्या बलविंदर सिंग यांची भूमिका एमी विर्क वठविणार आहे. क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. त्याचप्रमाणे त्याकाळी इंडिया टीमचे उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकीब सलीम दिसणार आहे.

सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना वठविणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. १९८३ मध्ये मान सिंग वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies player malcolm marshall son mali to play his role in ranveer singh starrer