बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच जिनिलिया देशमुखने तिचे सासरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबतचा आवडता फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलियाने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सेशनद्वारे चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी तिला चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले. त्यावेळी जिनिलियानेही मनमोकळेपणाने त्याची उत्तर दिली. तुमचा विलासराव देशमुख यांच्यासोबतचा सर्वात आवडता फोटो कोणता? असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला.

“मी १०० टक्के समाधानी नाही कारण…”, सिनेसृष्टीतील कारकिर्दीबद्दलच्या प्रश्नावर मुक्ता बर्वेचं उत्तर

त्यावर उत्तर देताना जिनिलियाने त्यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात जिनिलिया ही विलासराव देशमुख यांची गळाभेट घेत आहे. यावर तिने पपा असे लिहित हार्ट इमोजी शेअर केला आहे. जिनिलियाची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

“मी जर तुम्हाला चुकीची वाटत असेन तर…” ट्रोलर्सना अँबर हर्डचं सडेतोड उत्तर

दरम्यान वेड या मराठी चित्रपटाद्वारे जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच जिनिलिया ही मिस्टर मम्मी, ट्रायल पिरीयड यासारख्या चित्रपटांद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is your favorite photo with vilasrao deshmukh genelia share special movement nrp