२०२२ वर्ष हे खऱ्या अर्थाने कन्नड चित्रपटसृष्टीसाठी लकी ठरलं आहे. मागच्या वर्षी ‘केजीएफ २’ आणि ‘कांतारा’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचबरोबरीने जगाला कन्नड चित्रपटसृष्टीची ओळख मिळवून दिली. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कांतारा’ चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आता देशाच्या पंतप्रधानांनी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभिनेत्रींची भेट घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यश, रिषभ शेट्टी, अश्विनी पुनीत राजकुमार आणि विजय किरागांडूर यांनी मोदींची भेट घेतली. बंगळुरूमधील राजभवनात ही भेट झाली. होम्बाळे प्रॉडक्शन ज्यांनी ‘कांतारा’, ‘केजीएफ २’ यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा : श्रेयस तळपदेने जाहीरपणे मागितली प्रेक्षकांची माफी; हिंदूंच्या भावना दुखावणारा १० वर्षांपूर्वीच्या चित्रपटातील ‘तो’ सीन ठरला निमित्त

या भेटीदरम्यान पंतप्रधान आणि कन्नड कलाकार यांच्यात बरीच चर्चा झाली, गप्पा रंगल्या. त्याविषयी ‘कांतारा’ चित्रपटातील अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी म्हणाला, “ही माझ्यासाठी एखादी स्वप्नं पूर्ण होण्यासारखी गोष्ट आहे. मी प्रधानमंत्री यांना एक महान नायक मानतो. त्यांनासुद्धा आम्हाला भेटून बरं वाटलं. एकूणच कन्नड चित्रपटसृष्टीत काय सुरू आहे आणि चित्रपटसृष्टीत अजून काय काय हवं आहे याविषयी त्यांनी विचारपूस केली. ‘कांतारा’विषयी, त्यात दाखवलेल्या लोककलेविषयी, चित्रपटाने जगभरात मिळवलेल्या लोकप्रियतेविषयी त्यांना ठाऊक होतं. बऱ्याचदा त्यांच्यातोंडी ‘कांतारा’ हा शब्द ऐकून मलाही खूप बरं वाटलं.” रिषभचा हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

याबरोबरच कलाकारांनी मनोरंजन उद्योग, राज्यातील चित्रपटगृहांची संख्या, चित्रपटांचा प्रभाव आणि अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळू शकते यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. होम्बाळे प्रॉडक्शनने काही दिवसांपूर्वी घोषणा केली की ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल येणार आहे रिषभ शेट्टीने यावर काम सुरु केलं आहे. तर दुसरीकडे ‘केजीएफ ३’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल मात्र या चित्रपटात यश दिसणार नाही त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे.