बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन सध्या सतत डॉक्टरला भेट देत आहे. मिड-डे डॉट कॉमच्या वृत्तानुसार उपनगरतील रुग्णालयात डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी जाताना ती अनेकवेळा आढळली. पण, रुग्णालयातील कर्मचा-यांना याबाबतची गुप्तता बाळगण्यास सांगतिले गेले असून, त्यांनी याबाबत मौन पाळले आहे.
विद्या बहुतेकवेळा रुग्णालयात जाताना आढळली आहे. यावेळी तिच्या कुटुंबातील व्यक्तीदेखील तिच्यासोबत असते, मिडे-डे डॉट कॉमच्या सूत्रांनी म्हटले आहे. विद्याच्या या भेटीमागे अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र, यामागचे कारण विद्याने गुलदसत्यात ठेवायचे ठरवलेले दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने दोन वर्षानंतर कुटुंब वाढवण्याचा विचार करणार असल्याचे सांगितले होते. यूटीव्हीचे प्रमुख सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी विवाह केलेल्या विद्याचे ‘बॉबी जासूस’ आणि ‘शादी के साइड इफेक्ट्स’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

Story img Loader