प्रशांत नील यांच्या ‘केजीएफ’ सीरिजमुळे यशची क्रेझ प्रचंड वाढली. आधी फक्त दाक्षिणात्य राज्यांत लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याला उत्तरेकडील राज्यांतही प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘केजीएफ’च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ‘केजीएफ २’ने तर बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. याच ‘केजीएफ’ फेम यशने पहिल्या भागाच्या प्रदर्शनाच्या वेळी बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर व रणवीर सिंगबद्दल भाष्य केलं होतं.
इतकंच नव्हे तर रणवीर सिंहचं आधीचं काम त्याला फारसं आवडलेलं नसल्याचंही त्याने सांगितलं होतं. २०१८ मध्ये ‘इटीव्ही भारत’शी संवाद साधताना यश म्हणाला, “अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे माझे प्रचंड आवडते नट आहेत. रणबीर कपूर व रणवीर सिंहसुद्धा चांगले आहेत. रणवीरचं सुरुवातीचं काम मला फारसं आवडायचं नाही, पण आता त्याने कमालीचे चित्रपट केले आहेत. संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे ‘बाजीराव मस्तानी’ ‘पद्मावत’ हे रणवीरचे चित्रपट मला प्रचंड आवडले.”
रणबीरविषयी बोलताना यश म्हणाला, “रणबीरचा ‘संजू’ मी पाहिला मला तो फार आवडला, त्याचे आधीचे चित्रपटही मला फार आवडले. त्याची काम करायची पद्धतही वेगळीच आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मला तो थोडा विचलित झाल्यासारखा वाटतोय, पण ‘संजू’मध्ये त्याचं काम उत्तम झालं होतं.”
आणखी वाचा : चेंबुरच्या चाळीत वाढलेल्या, अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेल्या अनिल कपूर यांचा ‘झकास’ प्रवास ठाऊक आहे का?
रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’सध्या बॉक्स ऑफिसवर धुडगूस घालत आहे. रणबीरच्या या चित्रपटाने ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर केजीएफ स्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर ३’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. अद्याप याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. याबरोबरच यशने त्याच्या आगामी १९ व्या प्रोजेक्टचीही घोषणा केली आहे. या चित्रपटाचं टायटल असेल ‘टॉक्सिक’ अन् हा चित्रपट गीतू मोहनदास दिग्दर्शित करणार आहेत.