आमिर खान बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. सध्या तो ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीना व्यतिरिक्त आमिरनं बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केलं आहे ज्यात राणी मुखर्जीच्या नावाचा समावेश होतो. राणी मुखर्जी फक्त आमिरची सहकलाकराच नाही तर एकेकाळी खूप मोठी चाहती देखील होती. एवढंच नाही तर ती एकदा आमिरची ऑटोग्राफ घेण्यासाठी त्याच्याकडे गेली होती मात्र त्यावेळी आमिरनं तिला खूपच विचित्र प्रतिक्रिया दिली होती.
राणी मुखर्जीनं अनेक मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला आहे की तिला कधीच अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. ती केवळ तिच्या आईमुळे या क्षेत्रात आली. अशाच एका मुलाखतीत राणीनं आमिर खानसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला होता. त्यांची पहिली भेट झाली त्यावेळी राणी मुखर्जीनं बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. पण ती आमिरची चाहती होती आणि त्यामुळेच एकदा ती त्याच्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी गेली होती. जेव्हा राणी आमिरकडे पोहोचली तेव्हा त्यानं तिला पाहून राग व्यक्त केला होता.
आणखी वाचा- “हा चित्रपट एलियन्ससाठी…” केआरकेनं उडवली ‘ब्रह्मास्त्र’ ट्रेलरची खिल्ली
राणी मुखर्जी एका मुलाखतीत म्हणाली होती, “मी नेहमीच आमिर खान आणि शाहरुख खान यांची खूप मोठी चाहती होते. पण जेव्हा मी एकदा आमिरची ऑटोग्राफ घेण्यासाठी त्याच्याकडे गेले तेव्हा तो जूही चावलासोबत ‘लव लव लव’ चित्रपटाचं शूटिंग करत होता. मी आनंदात त्याच्याकडे गेले आणि माझी ऑटोग्राफ बुक त्याच्याकडे दिली. पण त्यावेळी तो थोडा रागात असलेला मला दिसला. त्याने फक्त माझी बुक घेतली आणि त्यावर साइन करून मला परत केली. त्याच्या अशा वागण्यानं मी दुखावले गेले होते.”
आणखी वाचा- Video : “आणखी किती फोटो काढणार?” चाहत्यावर मलायका अरोरा भडकली
आमिर खान आणि राणी मुखर्जी यांनी ‘गुलाम’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि जेव्हा ते या चित्रपटाचं शूटिंग करत होते तेव्हा राणी मुखर्जीनं आमिरला या घटनेची आठवण करून दिली होती. राणीनं एका मुलाखतीत सांगितलं, “जेव्हा आम्ही ‘आती क्या खंडाला’चं शूटिंग करत होतो तेव्हा मी त्याला विचारलं होतं, ‘आमिर तुला आठवतं का की जेव्हा तू ‘लव लव लव’ चित्रपटाचं शूटिंग करत होतास तेव्हा एका मुलीनं तुझ्याकडे ऑटोग्राम मागितली होती. ती मुलगी मी होते’ यावर त्याला विश्वास बसत नव्हता. पण मग जेव्हा मी माझी ऑटोग्राफ बुक दाखवली तेव्हा मात्र त्याला ते पटलं.”