बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या आमिर त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’च्या रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच त्याने या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. तो त्याच्या चित्रपटांपासून खासगी आयुष्यामुळे ही चर्चेत असतो. यावेळी आमिर त्याच्या एका जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. एका मुलीने त्याच्या प्रेमाला आणि त्याला नकार दिला होता म्हणून मुंडण केल्याचा खुलासा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटासाठी आमिरने मुंडण केल्याचे अनेकांचे मत होते. मात्र, आमिरने ‘सिमी गरेवाल’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, त्याने मुंडण करून दिग्दर्शक केतन मेहता यांना आश्चर्यचकित केले होते. तो म्हणाला, “बर्‍याच जणांना वाटतं की मी चित्रपटासाठी मुंडण केलं, पण प्रत्यक्षात मी मुंडण दुसऱ्याच कारणासाठी केलं.”

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : पत्नी ताहिरा कश्यपने सेक्स लाइफवर लिहिलेल्या पुस्तकाबाबत आयुषमान खुरानाने केले वक्तव्य, म्हणाला…

आमिर खान म्हणाला, “मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो तिने मला नकार दिला होता. म्हणजे एके दिवशी तिने मला सांगितले की ती माझ्यावर प्रेम करत नाही आणि त्यावर माझी प्रतिक्रिया म्हणून मी मुंडण केले. हे एक अतिशय बालिश कृत्य होते, परंतु मी ते केले. तेव्हाच केतनने मला भेटायला बोलावले होते. मी त्याला भेटायला गेलो आणि मला बघुन तो आश्चर्याने म्हणाला, तुझे केस कुठे आहेत.”

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

आमिरने १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘होली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आमिरच्या हेअरस्टाइलची चर्चा सर्वत्र सुरु होती.

आणखी वाचा : नवऱ्यासाठी नवस! अभिनेता सुरज थापरच्या पत्नीने केले मुंडण, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

आमिर लवकरच टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर आता ११ ऑगस्ट २०२२ रोजी पडद्यावर दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aamir khan shaved his head because of girl rejected him his debut film director ketan mehta surprised with haircut dcp
Show comments