बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अभिषेक आणि ऐश्वर्याला त्याच्या आई-वडिलांसोबत एकत्र राहण्यावर मजेशीर उत्तर दिलं आहे.
या व्हिडीओत ऑपरा वीन्फ्रे “अभिषेक आणि ऐश्वर्याला विचारते की तुम्ही दोघंही तुझ्या (अभिषेकच्या) आई-वडिलांसोबत राहतात. मग ते कसं जमतं?” असा प्रश्न विचारता अभिषेक म्हणाला, “तू देखील तुझ्या कुटुंबासोबत राहते मग ते कसं जमतं?” अभिषेकचं हे उत्तर ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येत व्यक्तीला हसू अनावर झाले.
आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत. २००२ सालामध्ये आलेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा ऐश्वर्या आणि अभिषेकची भेट झाली होती. पुढे २००६ सालामध्ये ‘उमराव जान’ सिनेमात दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे रंग बहरू लागले. २००७ सालामध्ये दोघांनी लग्नगाठही बांधली.