अभिनेता इरफान खानने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील ओळख निर्माण केली होती. संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयाने त्याने प्रेक्षकांची माने जिंकली होती. दोन वर्षांपूर्वी कॅन्सरसारख्या आजरारामुळे त्याचे निधन झाले. मात्र प्रेषक आजही त्याला विसरलेले नाहीत. इरफानने आजवर अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत त्याने ‘बिल्लू’ चित्रपटात काम केले होते. शाहरुख खान हा त्याच्या अभिनयाच्याबरोबरीने लोकांची खिल्ली उडवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिल्मफेअर पुरस्कार हा बॉलिवूडमधला मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखला जातो. या पुरस्काराचे निवेदन गेली अनेकवर्ष शाहरुख खान करत होता. शाहरुख आपल्या शैलीत या पुरस्काराचे निवेदन करत असे. २०१६ सालच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान खानने एक विनोदी कार्यक्रम केला होता ज्यात त्याने शाहरुखची खिल्ली उडवली होती. इरफान खान शाहरुखला म्हणाला की, ‘मी तुमच्या ‘मोहब्बते’ या चित्रपटावर एक व्हिडिओ बनवला आहे जो मला खूप आवडला आहे. या चित्रपटाने खूप पैसे कमावले आहेत पण तुम्ही चित्रपटात फारसे काही केले नाही. तुम्ही या चित्रपटात स्वेटर परिधान केलात आणि व्हायोलिन वाजवले होते. इरफानने लगेचच तयार केलेला विडंबनात्मक व्हिडिओ प्रेक्षकांना दाखवला, आणि प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

“बाय बाय यश समीर…” श्रेयस तळपदेचा फोटो शेअर करत संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक

व्हिडिओमध्ये इरफान शाहरुखच्याच पोशाखात दिसत होता कारण त्याने शाहरुखची प्रसिद्ध अशी हात पसरवण्याची पोझ यात दिली केली होती. शेवटी एक ट्विस्ट आला कारण इरफानने “कटपा ने बाहुबली को क्यू मारा” असे म्हटले, ज्यामुळे प्रेक्षक खूप हसले. इरफानच्या निधनानंतर शाहरुखने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली होती.

२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बिल्लू’ या चित्रपटात दोघांनी काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती खुद्द शाहरुख खानने केली होती तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. इरफान खानच्या जाण्याने केवळ प्रेक्षकच नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. ‘अंग्रेझी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When actor irfan khan make fun of shahrukh khan in filmfare event spg