बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांची लव्हस्टोरी आणि भन्नाट केमिस्ट्री तर साऱ्यांनाच माहित आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यातील हे प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना पहायला ही मिळतं. बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. रितेशसोबत लग्न झाल्यापासून जिनिलियाचा अभियन क्षेत्रातील वावर कमी झाला आहे. लग्नानंतर तिने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं.
बऱ्याच वेळा हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. त्याचप्रमाणे अनेक वेळा ते एकमेकांप्रतीचं प्रेमही व्यक्त करत असल्याचं दिसून येतं. जिनिलियाने मध्यंतरी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘आस्क मी एनीथिंग’ सत्राचे आयोजन केले होते. तिने तिच्या भविष्यातील काही प्रोजेक्ट्स आणि अगदी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्तरे दिली. सत्रादरम्यान, एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारले, ‘मॅडम तुम्हाला रितेश सरांकडून मिळालेली सर्वात चांगली भेट कोणती आहे?’ अभिनेत्रीने तिच्या दोन लहान मुलांचे, रियान देशमुख आणि राहिल देशमुख अशा दोघांचा फुटबॉल जर्सी घातलेला फोटो पोस्ट केला.
यंदाच्या गणेशोत्सवात ‘पुष्पा’च्या अवतारात दिसणार बाप्पा, फोटो झाले व्हायरल
रितेश आणि जिनिलिया यांची पहिली भेट २००३ मध्ये त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्यावेळी म्हणजे ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झाली. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान दोघांमध्ये सुंदर मैत्री झाली होती, ज्याचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्हा जिनिलियाच वय १६ होते तर रितेशचे वय २५ होते. जवळजवळ दहा वर्षे डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी लग्न केले. रियान आणि राहिल हे दोन मुलगे देखील आहेत.
रितेश आणि जिनिलिया यांनी ‘तुझे मेरी कसम’, ‘मस्ती’, ‘तेरे नाल लव्ह’ हो गया यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘लय भारी’ आणि ‘माउली’ या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र गाणे केले आहे. या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत.