अभिनेता सलमान खान जितका कूल आहे. तितकाच भयंकर त्याचा राग आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या या स्वभावाला अनेकजण ओळखून आहेत. त्यामुळे सलमान खानसोबत पंगा घेणं सगळेच टाळतात. मात्र एका शूटिंग दरम्यान एक अभिनेता चक्क सलमान खानवर जोरात ओरडला होता. सलमान खानवर जोर जोरात ओरडणारा हा अभिनेता म्हणजे आदित्य रॉय कपूर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाखतीत स्वत: आदित्य रॉय कपूरने या घटनेचा खुलासा केला होता. २००९ सालात आलेल्या ‘लंडन ड्रीम्स’ या सिनेमाच्या शूटिंगवेळेचा हा किस्सा आहे. या सिनेमात अभिनेता सलमान खान, अजय देवगन, आदित्य रॉय कपूर आणि रणविजय सिंह मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला म्हणावी तशी पसंती मिळाली नाही शिवाय बॉक्स ऑफिसवरदेखील सिनेमा फ्लॉप ठरला होता. या सिनेमातील आदित्यचा पहिला शॉटच सलमान खानसोबत होता. या सीनमध्ये आदित्यला सलमानवर जोर जोरात ओरडायचं होतं.

हा मजेशीर किस्सा सांगताना आदित्य म्हणाला, “सिनेमाच्या त्या सीनमध्ये मला सलमान खान वर जोर जोरात ओरडायचं होतं. तो आमचा बॅण्ड सोडून जाणार म्हणून रागात त्याच्यावर ओरडणं ही त्या सीनची गरज होते. हा खरं तर शूटिंगचा भाग होता. मात्र माझ्या मनात वेगळेच विचार येत होते. मी सलमान खानवर कसं ओरडणार,  एवढी हिंमत कशी दाखवू या चिंतेत मी होतो.” असं आदित्य रॉय कपूर म्हणाला.

हे देखील वाचा: “या सिनेमासाठी माझ्याहून उत्तम दिग्दर्शक कुणी असूच शकत नाही”; कंगना रणौतचा नवा दावा

हे देखील वाचा: “५१८ सिनेमांमध्ये काम करूनही यांनी मला ओळखलं नाही”; अनुपम खेर यांचा व्हिडीओ व्हायरल

पुढे आदित्य म्हणाला, “सलमान खानवर ओरडण्याची माझी हिंमतच होत नव्हती. त्यामुळे मी यासाठी खूप रिटेक घेतले..इतके की मला आठवतही नाही. या सीनमध्ये सलमानचे डोळे बंद होते. अखेर मी मोठ्या हिंमतीने त्याच्यावर ओरडत सीन पूर्ण केला. यावर सलमानची काय प्रतिक्रिया असेल माहित नाही. पण तेव्हा मी खूप ओव्हर रिअ‍ॅक्ट केलं असं मला वाटतं.” असं आदित्य म्हणाला.

हा सीन पूर्ण झाल्यानंतर सलमान खानने डोळे उघडल्यानंतर आदित्यचं त्याने सीन उत्तम केल्याचं म्हणत कौतुक केलं. इंडस्ट्रीत नवीन असूनही सलमान खान आणि अजय देवगणने खूप पाठिंबा दिल्याचं आदित्य म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aditya roy kapoor shout on salman khan for landon dream film kpw