सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील लव्ह स्टोरीपैकी एक आहे. सलमान आणि ऐश्वर्याच्या फक्त अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली. एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या कपलने ब्रेकअप केल्यानंतर त्यांच्यातील भांडणं बराच काळ चर्चेत राहिली. किंबहुना आजही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजस्वीने बॉयफ्रेंड करण कुंद्राला न सांगताच उरकला साखरपुडा? अभिनेता तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला….

सलमान आणि ऐश्वर्याचं नातं तुटून दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरीही या दोघांचे एकमेकांबरोबरचे जुने फोटो, व्हिडीओ किंवा त्यांनी एकमेकांबद्दल केलेली वक्तव्य अधूनमधून चर्चेत असतात. अलीकडेच ऐश्वर्याचा सलमानबद्दल बोलतानाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. सिमी ग्रेवालचा चॅट शो ९० च्या दशकात खूप लोकप्रिय होता. या शोमध्ये अनेक स्टार्स हजेरी लावायचे आणि मनमोकळ्या गप्पा मारायचे. १९९९ मध्ये, ऐश्वर्या राय देखील शोच्या एका एपिसोडमध्ये दिसली होती. त्यावेळी ती तिच्या करिअर आणि चित्रपटांबद्दल खुलेपणाने बोलली होती.

Photos: ४१० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’! रणबीर-आलियासह बिग बींनी घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहिलात का?

याच शोदरम्यान सिमीने ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता. ‘तुझ्या मते इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सीएस्ट आणि गॉर्जिअस पुरुष कोण आहे?’ असं सिमीने ऐश्वर्याला विचारलं होतं. त्यावर ऐश्वर्याने बराच विचार करून सेक्सीएस्ट शब्दाला चार्मिंग शब्दाशी बदलू शकतो का असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर सिमी नाही म्हणाली. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली आता तर त्याचंच नाव घ्यावं लागेल ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील पुरुषांमधून निवडलं गेलंय. त्यानंतर तिने लाजत सलमान खानचं नाव घेतलं होतं.

दरम्यान, सलमान आणि ऐश्वर्या या दोघांनी एकमेकांना २-३ वर्षे डेट केलं होतं. इतकंच नाही तर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं, पण नंतर अचानक असं काही घडलं की दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने सलमानवर हिंसाचाराचा आरोप केला होता, त्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर हे दोघेही ना कोणत्या चित्रपटात एकत्र दिसले ना कोणत्याही कार्यक्रमात. ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केलं आणि दोघांनाही आराध्या नावाची मुलगी आहे. तर सलमान अजूनही अविवाहित आहे.  

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai called salman khan most sexiest man video viral hrc