बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचं नावं आराध्या आहे. बऱ्याचवेळा काही चाहते बच्चन कुटुंबा विषयी भविष्यवाणी करताना दिसतात. दरम्यान, अशीच एक भविष्यवाणी आराध्याविषयी केली होती. ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर फक्त बच्चन कुटुंब नाही तर संपूर्ण देशालाही धक्का बसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आराध्या ही आता १० वर्षांची झाली आहे. जेव्हा आराध्याचा जन्म झाला होता तेव्हा तिच्या विषयी एक ज्योतिषीने भविष्यवाणी केली होती. त्या ज्योतिषीच्या म्हणण्याप्रमाणे आराध्या बॉलिवूडमध्ये नाही तर राजकारणात जाणार आणि एवढचं नाही तर ती देशाची प्रधानमंत्री होणार. ज्योतिष डी ज्ञानेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार आराध्या ही मोठी झाल्यावर राजकारणात जाणार, एवढचं नाही तर तिचं उज्वळ भविष्य आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्यावृत्तानुसार हे तेच ज्योतिष आहेत. ज्यांनी रजणीकांत आणि कमल हसन राजकारणात जाणार असल्याची भविष्यवाणी केली होती. यासोबत त्यांनी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता आराध्या विषयी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरणार की नाही हे तर आपल्याला कळेलच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai heard about aaradhya bachchans prediction she was in shock dcp