बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त चित्रपट करणारा अभिनेता आहे. अक्षयने जेव्हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हा त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्या अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि रेखा यांची नावं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९० च्या दशकातील रवीनासोबत असलेल्या अक्षयच्या रिलेशनशिपच्या चर्चा अजुनही संपलेल्या नाही. आजही लोक त्यावर बोलत असतात. ९०च्या दशकात हे दोघे ही त्यांच्या करिअरमध्ये टॉपला होते. एवढचं काय तर त्यांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मोहरा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

अक्षय आणि रवीना हे एकमेकांच्या खूप जवळ होते कारण ते दोघे ही पंजाबी त्यामुळे एकमेकांमध्ये अनेक गोष्टी साम्य होत्या. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की ते अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपविषयी सीरिअस होते आणि त्यांच्या रिलेशनशिपला पुढच्या टप्प्यावर न्यायचे होते.

अक्षय आणि रवीना दोघांनीही एका मंदिरात गुपचूप लग्न केले असे म्हटले जातं होते. एका चॅट शोमध्ये रवीना म्हणाली होती की, त्याचे कुटुंब दिल्लीहून आले आणि त्यांच्या कुटुंबातील मोठ्यांनीही तिच्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला. ‘कॉस्मोपॉलिटन’ने दिलेल्या वृत्तानुसार, “हा एक विचार करून घेतलेला निर्णय होता. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीशी माझा साखरपुडा झाला होता. मला अगदी सामान्य जीवन जगायचे होते. मी लग्नाआधीच काम सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण आम्हाला वाटले होते की माझा शेवटचा शूटचा दिवस असेल तेव्हा आम्ही लग्न करू. जेव्हा मी माझ्या करिअरला पुन्हा सुरुवात केली तेव्हा तो पुन्हा म्हणाला की ते सोड आणि आपण लग्न करूया. पण, नंतर मी त्याला सांगितले की, एकदा मी माझ्या करिअरला न निवडता तुला निवडले होते, पण आता मी तुला नाही तर करिअरला निवडेन.”

आणखी वाचा : ‘मला त्याची संपूर्ण हातगाडी…’, रस्त्यावर फळे फेकणाऱ्या महिलेचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली

रवीना पुढे म्हणाली, “हा साखरपुडा मोठ्या जल्लोषात झाला होता. यावेळी पंडित होते पूजा करण्यात आली होती. त्याचे कुटुंब दिल्लीहून आले होते आणि माझे कुटुंब सुद्धा दिल्लीहून आले होते. त्याच्या घरातल्या एका मोठ्या व्यक्ती माझ्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला होता आणि लोकांना लग्न झालं असं वाटलं.”

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘बिचुकले पुरुषी अहंकारी अन्…’, शमिताने शो सोडण्याची व्यक्त केली इच्छा

दरम्यान, १९९८ मध्ये रवीना आणि अक्षय विभक्त झाले. अक्षयने कधीच त्याच्या आणि रवीनाच्या साखरपुड्यावर वक्तव्य केले नाही. पण ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आमचा फक्त साखरपुडा झाला होता जो नंतर तुटला, पण आमचं लग्न झालं नव्हतं.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When akshay kumar talked about his failed engagement with raveena tandon i have been shooting for a long time even after dcp