अभिनेत्री राधिका आपटे फार क्वचित मराठी भाषेत बोलताना दिसते. तिच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने अक्षय कुमारसोबत मराठीत गप्पा मारल्या आहेत. या गप्पांमध्ये त्यांच्यासोबत सोनम कपूरसुद्धा सहभागी झाली आहे. या तिघांची मुख्य भूमिका असलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून प्रेक्षकांमध्येही त्याची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

अक्षयने त्याच्या ट्विटरवर यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गाडीतून प्रवास करत असताना त्याने राधिका आणि सोनम या सहकलाकारांशी संवाद साधला आहे. अक्षय आणि राधिकाचा मराठीतील हा मजेशीर संवाद सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओत राधिका त्याला सांगत असते की मी तुझे बरेच चित्रपट पाहिले आहेत. त्यावर अक्षयनेही तिला प्रतिप्रश्न विचारला. तर अक्षयच्या लोखंडवाला इथल्या शूटिंगचा किस्सा सोनम सांगते. ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा अनोखा फंडा वापरण्यात येत असून यातील कलाकारांच्या गप्पांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहेत.

वाचा : खऱ्या आयुष्यातील ‘राणा’सोबत अक्षयाचा गुपचूप साखरपुडा?

अरुणाचलम मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती केली होती.

Story img Loader