पेरिस सेंट जर्मेन (पीएसजी) आणि रियाद इलेवन यांच्यात सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे एका फुटबॉल सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यात फुटबॉलमधील महारथी आणि सर्वात लोकप्रिय खेळाडू ख्रिस्तिआनो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांनी सहभाग घेतला होता. मेस्सीने पीएसजी कडून तर रोनाल्डोने रियाद सीझन एलेवनकडून नेतृत्त्व करत शानदार खेळी खेळली.
या सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली. अमिताभ यांना या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. नुकतंच अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली. या दोन्ही संघांमधील प्रत्येक खेळाडूची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाबद्दल राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “त्यांना विषयाला…”
मेस्सी आणि रोनाल्डो यांनासुद्धा बच्चन यांनी भेटून त्यांच्याशी संवाद साधला. या सामन्यात किलियन एम्बाप्पे, सर्जियो रामोस और नेमार या दिग्गज खेळाडूंचासुद्धा समावेश होता. यांनी पीएसजी कडून सामन्यात भाग घेतला होता. सौदी अरेबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारे वाले सलेम अल-दावसारी और सऊद अब्दुलहामिद आणि सऊद अब्दुलहामिद यांनीसुद्धा या सोहळ्याला हजेरी लावली.
फिफा विश्वचषक २०२२ मधील लिओनेल मेस्सीच्या पराक्रमाची बरीच चर्चा झाली आहे. त्याने अर्जेंटिना फुटबॉल संघाला विजयापर्यंत नेले आणि आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे सिद्ध केले. ख्रिस्तिआनो रोनाल्डोने नव्या वर्षांत सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं. फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती दिली होती.