बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या वार्षिक कॅलेंडरकरिता फोटोशूट केले.
या कॅलेंडरवर प्रसिद्ध करण्यात येणा-या फोटोंमध्ये ७१ वर्षीय अमिताभ बच्चन टक्सूडो परिधान करून एका ऑटोरिक्षासमोर पोज देताना दिसणार आहेत. या फोटोशूटचा अनुभव ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ‘डब्बू रत्नानीच्या वार्षिक कॅलेंडरसाठी रिक्षासोबत… डब्बू रत्नानीसाठी कॅलेंडर शूट, टक्स, शेड्स आणि ऑटोरिक्षा’, अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले आहे. आणखी एका फोटोमध्ये अमिताभ हे रत्नानी आणि त्याची मुलगी मारिया हिच्यासोबत मजामस्ती करताना दिसत आहेत. सेलिब्रिटी कॅलेंडरसाठी शूट करण्याची बिग बींची ही पहिलीच वेळ नसून, त्यांनी गेल्यावर्षीही रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.

Story img Loader