देशातील प्रतिष्ठित ७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा २०२४ आज (८ ऑक्टोबर रोजी) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडणार आहे. विजेत्याच्या नावांची यादी ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आली होती. या सर्व विजेत्यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसह अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना या समारंभात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा लाइव्ह कुठे पाहता येईल ते जाणून घेऊयात.

कुठे पार पडतोय ७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा?

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी दिल्लीमध्ये होत आहे. हा बहुप्रतिक्षित सोहळा ८ ऑक्टोबर रोजी विज्ञान भवनात होणार आहे. या सोहळ्यात मागच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि सिनेसृष्टीतील प्रतिभावान लोक एकत्र येतील.

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना भारत सरकार काय बक्षीस देते? जाणून घ्या

Live कुठे पाहता येईल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

तुम्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा डीडी न्यूज चॅनेलच्या युट्यूबवर लाइव्ह पाहू शकता. याचे प्रक्षेपण आज दुपारी ३ वाजता सुरू होईल.

70th National Film Awards : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’ने मारली बाजी! तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; पाहा विजेत्यांची यादी

७० व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट – अट्टम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी, कांतारा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन, तिरुचित्रबलम आणि मानसी पारेख, कच्छ एक्स्प्रेस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या, उंचाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता, उंचाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा, फौजी
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट – कांतारा
सर्वोत्कृष्ट पदार्पण – प्रमोद कुमार
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पोन्नियिन सेल्वन – भाग १
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – Baaghi Di Dhee
सर्वोत्कृष्ट मल्ल्याळम चित्रपट – सौदी वेल्लाक्का CC.225/2009
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट तिवा चित्रपट – सिक्यसाल
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – काबेरी अंतरधन
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – इमुथी पुथी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शत – प्रितम, ए आर रहेमान
सर्वोत्कृष्ट गायक – ब्रह्मास्त्र अरिजितसिंह
सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट – द कोकोनट ट्री
सर्वोत्कृष्ट निवेदक – मुरमूर्स ऑफ द जंगल
बेस्ट डॉक्युमेंट्री – मुरमूर्स ऑफ द जंगल