बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्रियांका चोप्राने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेते अन्नू कपूर. ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. अन्नू कपूर यांनी १९८३ मध्ये सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांनी अनेक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. मात्र २०११ मध्ये अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्राबद्दल एक विधान केले होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्नू कपूर आणि प्रियंका यांनी अक्षय कुमारसोबत ऐतराज या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर विशाल भारद्वाजच्या सात खून माफ या चित्रपटातही त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात खून माफ’मध्ये प्रियांकाचा टॉपलेस सीन हा प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटात इरफान खान, नसिरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश आणि रशियन अभिनेता अलेक्झांडर डायचेन्को यांनीही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

मात्र २०११ मध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रियांका आणि अन्नू कपूर यांच्या शाब्दिक युद्ध रंगले होते. प्रियांका आणि अन्नू कपूर यांचा वाद हा सर्वात मोठ्या वादांपैकी एक मानला जातो. प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिल्याने हा वाद सुरु झाला होता. त्यावेळी अन्नू कपूर म्हणाले होते की, “मी चांगला दिसत नाही. मी हिरो नाही. जर मी हिरो असतो तर कदाचित प्रियांकाने माझ्यासोबत इंटिमेट सीन केले असते. कारण जेव्हा तुमची प्रतिभा नसते, तेव्हा तुम्हाला फक्त चांगले दिसणे आवश्यक आहे, असं मला वाटतं.”

त्यानंतर ‘हिंदुस्तान टाईम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत देताना प्रियांका चोप्राने याबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी ती म्हणाली की, “जर त्यांना इंटिमेट सीन करायचे असतील आणि अशा प्रकारची अपमानास्पद टीका करायची असेल, तर त्यांनी अशा प्रकारचे चित्रपट केले पाहिजेत. अशी दृश्ये आमच्या चित्रपटाचा भाग कधीच नव्हती.”

“मी आणि कतरिना त्या मोजक्या लोकांपैकी आहोत ज्यांनी…”, करिअरच्या सुरुवातीचा ‘तो’ किस्सा सांगताना दीपिका पदुकोण भावूक

यानंतर अन्नू कपूर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “मी प्रियांकाच्या विरोधात एक शब्दही बोललेलो नाही. जेव्हा मला तिच्या पतीच्या भूमिकेतील माझ्या भावनांबद्दल विचारण्यात आले तेव्हा मी म्हणालो की लोक माझ्या कामाचा न्याय करतील. गुणवत्तेचा नाही. मी प्रियांकाच्या नवऱ्याची भूमिका करत आहे. मी पात्र अभिनेता आहे, म्हणूनच ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे प्रियांकाला माझा मोठा सल्ला आहे की बेटा, हे सर्व फारसे गांभीर्याने घेऊ नकोस”, असे अन्नू कपूर म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When annu kapoor said priyanka chopra refused an intimate scene with him in saat khoon maaf nrp
Show comments