गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेचा शाहरुख खानचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकणामुळे चर्चेत आहे. ड्रग्स प्रकरणात त्याच नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि ऑक्टोबरमध्ये आर्यनला जवळपास महिनाभर तुरुंगात काढावे लागला. मात्र, या आधी एकदा शाहरुख आणि त्याची मुलं ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होते. त्यापैकी एक म्हणजे आर्यन, सुहाना आणि अबराम शाहरुखला त्यांच्या धर्माविषयी बोलायचे तेव्हा तो त्यांना काय उत्तर द्यायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखला त्याच्या मुलांची नाव अशी हवी होती की जी भारतात असलेल्या लोकांना लक्षात राहिल. शाहरुख हा मुस्लीम आणि त्याची पत्नी गौरी ही हिंदू असल्याने त्याचे मुलं त्याला प्रश्न विचारायचे की त्यांचा धर्म कोणता आहे. याचे उत्तर शाहरुख फिलॉसॉफिकल अंदाजात द्यायचा.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

शाहरूखने एका मुलाखतीत सांगितले आहे. जेव्हा पण मुलं मला आपला धर्म कोणता आहे? असा प्रश्न विचारतात. तेव्हा मी बोलतो की तुम्ही आधी भारतीय आहात आणि मानवता हा तुमचा धर्म आहे. बऱ्याचवेळा शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर एका गाण्याने दिल्याचे त्याने सांगितले आणि म्हणाला ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा..’ हे ते गाणं आहे.

आणखी वाचा : लग्नानंतर विकी आणि कतरिना राहणार भाड्याच्या घरात…महिन्याचे भाडे ऐकून फुटेल घाम!

दरम्यान, शाहरुख दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सक्रिय होणार आहे. तो पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच जॉन आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर सलमान खान या चित्रपटात पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aryan khan and suhana khan used to ask shahrukh about their religion dcp