बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यप ही लोकप्रिय लेखिका आहे. ताहिरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच ताहिराचे ‘द 7 सिन्स ऑफ बींग ए मदर’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. या पुस्तकात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यापैकी एक म्हणजे तिचा आणि आयुषमान खुरानाचा बॅंकॉकमधील हनीमूनशी जोडलेला एक किस्सा आहे. आयुषमान चुकून ताहिराचे ब्रेस्ट मिल्क प्यायला होता.

ताहिराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हे सांगितले आहे. ताहिरा तिच्या ७ महिन्याच्या मुलाला तिच्या आई-वडिलांकडे सोडून हनीमूनला गेली होती. मात्र, त्याआधी तिने तिच्या मुलासाठी ब्रेस्ट मिल्कच्या काही बॉटलं भरून ठेवल्या होत्या. विमानतळावर पोहोचल्यानंतर ताहिराने तिच्या आईला फोन केला. तेव्हा तिची आई म्हणाली की मुलगा ठिक आहे मात्र, ब्रेस्ट मिल्क संपलं आहे. हे ऐकून ताहिरा काळजीत पडली, पण तिच्याकडे पर्याय नव्हता आणि तिला चेक इन करावे लागले.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

विमानात ताहिरा अस्वस्थ होत होती कारण तिला सतत बाथरुममध्ये जाऊन ब्रेस्ट मिल्क काठावे लागत होते. त्यावेळी आयुषमानने तिला सांभाळले. त्यानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर सुद्धा तिने ब्रेस्ट मिल्क काढले. त्यानंतर ती तिच्या आईला फोन करण्यासाठी गेली. ताहिरा ब्रेस्ट मिल्कच्या बॉटलमधून दूध फेकायला विसरली होती.

आणखी वाचा : शाहरुखनंतर गौरी खान आर्थर रोड तुरुंगात, मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी रवाना

जेव्हा ताहिरा तिथून आली तेव्हा तिने पाहिलं की ब्रेस्ट मिल्कची बॉटलं ही संपली आहे. तेव्हा आयुषमान त्याच प्रोटीन शेक घेऊन बेडरूममध्ये गेला होता. ब्रेस्ट मिल्कची बॉटल संपलेली पाहून ताहिराने त्याला प्रश्न विचारला. त्यावर तो हसत त्याच्या मिशीवर असलेले दुध पुसत म्हणाला, “त्याचे तापमान बरोबर होते, हे दूध खूप पौष्टिक होते आणि त्यासोबत प्रोटीन शेकमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स देखील झाले.”

आणखी वाचा : “मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात…”, आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये विसरली होती बाळाला

ताहिरा पुढे म्हणाली की त्यानंतर ती ब्रेस्ट मिल्कची बॉटल आयुषमानपासून लपवून ठेवायची. ताहिरा आणि आयुषमानचे लग्न २००८ साली झाले. याआधी बरेच वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना दोन मुलं आहेत. मुलाचे नाव विराजवीर आणि मुलीचे नाव वरुष्का आहे.

Story img Loader