अभिनेते भगवान यांची आज जयंती.. ज्या माणसाने सगळ्या जगाला नाचायला शिकवलं असा हा फिल्मी दुनियेत रमलेला ‘अलबेला’ आणि कलंदर माणूस. हिंदी सिनेमा सृष्टीला बॉलिवूड हे नाव येण्यापूर्वी ज्यांनी चंदेरी दिवस दाखवले होते त्या माणसाचं नाव म्हणजे भगवानदादा. भगवान आबाजी पालव यांचं भारतीय सिनेसृष्टीतलं योगदान खूपच मोठं आहे. चमचमत्या चंदेरी दुनियेत त्यांनी प्रचंड चढउतार पाहिले. दोन स्टुडिओजचे मालक, सात ते आठ कार आणि बंगला यांचे मालक असलेले भगवान दादा हे बेफामपणे जगले.

आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आठवण येते आहे त्या किश्श्याची ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन या सुपरस्टारच्या नृत्यातली चूक काढली होती. अमिताभ बच्चनने ती प्रांजळपणे मान्य केली होती. त्यानंतर तीन शॉटसाठी कसाबसा एक तास दिलेला अमिताभ घड्याळ न पाहता गाणं पूर्ण होईपर्यंत थांबला होता.

mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
siddharth chandekar special connection with 24 January
सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’चं आहे खास महत्त्व! काय आहे कनेक्शन? ‘तो’ Video शेअर करत म्हणाला…
Amitabh bachchan post about ratan tata death
एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स

काय आहे अमिताभ आणि भगवान दादांचा किस्सा?

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांच्या ‘अलबेला मा. भगवान’ या पुस्तकात हा किस्सा लिहिलेला आहे. ‘बोलता बोलता भगवान दादांना अमिताभ बच्चनची एक आठवण आली. त्यांना सिनेमाचं नाव आठवत नाही पण चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून एक नृत्य करण्यासाठी अमिताभला पाचारण करण्यात आलं होतं. या नृत्यात दोनशे ज्युनियर आर्टिस्ट होते आणि नऊ विनोदवीर. भगवानदादा हे या नऊ विनोदवीरांमधले एक होते.’

अमिताभने नृत्याच्या चित्रीकरणासाठी दिलेली वेळ मर्यादित

अमिताभने या नृत्याच्या चित्रीकरणासाठी दुपारच्या शिफ्टनंतर वेळ दिला होता. रात्री आठच्या आत नृत्याचे चित्रण उरकले गेले पाहिजे त्यानंतर आपण थांबणार नाही असे अमिताभने बजावले होते. संध्याकाळचे साडेसात वाजत आले तरीही त्या नृत्यातील तीन शॉट्सचे चित्रण अद्याप मागे उरले होते आणि उरलेल्या अर्ध्या तासाच्या वेळात ते पूर्ण होणे शक्य नव्हते. त्या तीन शॉट्सच्या चित्रीकरणासाठी अमिताभला पुन्हा बोलवायचे म्हणजे त्याची तारीख मिळेल तेव्हा निर्मात्याला सेट उभारावा लागणार होता. तसंच दोनशे ज्युनिअर आर्टिस्ट आणि नऊ विनोदवीरांच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार होता. नव्यानं हा एवढा खर्च सोसण्याची निर्मात्याची ताकद नव्हती. त्यामुळे अमिताभने थोडा वेळ वाढवून द्यावा असे त्याला वाटत होते. पण हे सगळं अमिताभला सांगून थांबवायचे कुणी? हा प्रश्न निर्माण झाला होता.

पी. एल. राज हे या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन करत होते. त्यांना काय वाटलं माहित नाही पण ते दादांच्या (भगवान) जवळ आले आणि त्यांना म्हणाले दादा, तुम्ही अमिताभला थांबायची विनंती जरा करुन पाहा की. भगवान दादा म्हणाले मी विनंती करुन तो थांबेल? त्यावर राज म्हणाले की मला वाटतं तो थांबेल. कारण सेटवर सर्वात वयोवृद्ध तुम्ही आहात. तुमच्या वयाचा मान राखण्यासाठी का होईना तो थांबेल. राज यांनी एवढे सांगिल्यानंतर दादांनी अमिताभकडे तासाभराचा वेळ वाढवून मागितला.

उरलेले चित्रण तासाभरात संपेल असे तुम्हाला वाटते का? असं अमिताभने भगवानदादांना विचारले. तीन शॉट्सचे चित्रण तासाभरात होणे शक्यच नव्हते. पण दादांनी राजकडून त्या नृत्याच्या शॉट डिव्हिजनचा जो कागद त्याने तयार केला होता तो मागवून घेतला आणि उरलेल्या तीन शॉट्सचा एकच शॉट केला आणि अमिताभला सांगितले की उरलेले चित्रण तासाभरात आवरेल ही माझी जबाबदारी.

भगवानदादांनी काय केलं?

भगवानदादांनी जबाबदारी घेतल्यावर अमिताभने तासाभराचा वेळ वाढवून दिला. दादा त्याला म्हणाले, टेकपूर्वी आपण फक्त एक रिहर्सल करु या. एर रिहर्सल झाली आणि त्यानंतर एकदम चित्रणालाच सुरुवात. चित्रण संपले आणि दिग्दर्शकापासून ते नृत्य दिग्दर्शकापर्यंत साऱ्यांनीच ओ.के. म्हणून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. दादा मात्र टाळ्यांच्या गजरात सामील झाले नाहीत. अमिताभकडे नुसते पाहात उभे राहिले. हे पाहून अमिताभने दादांना विचारले दादा काय झालं? काही चुकलं का? त्यावर दादा म्हणाले नृत्याची एक बीट चुकली की नाही? ती चूक अमिताभच्याही लक्षात आली होती. पण टेकनंतर सर्वजण टाळ्या वाजवून दाद देत आहेत हे पाहून त्याला वाटलं होतं की एवढीशी चूक या नृत्यात सहज खपून जाईल. पण भगवान दादांनी ती चूक अचूक पकडल्यामुळे त्याचा नाईलाज झाला होता. दादांना तो म्हणाला बरोबर आहे दादा तुमचं. चला, या नृत्याचा आपण आणखी एक टेक करु या. पुन्हा एकदा नृत्याचा टेक झाला आणि तो देताना अमिताभला वेळेचे भान राहिले नाही.

हा किस्सा वाचून आपल्याला लक्षात येतं काही भगवान दादांना त्या काळातला डान्सिंग स्टार का म्हटलं जायचं. मायानगरीच्या स्वप्ननगरीत प्रचंड यश पाहिलेला या माणसाने शेवटचं आयुष्य चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये काढलं. मनाशी कितीही नाी म्हटलं तरीही या वास्तवावर विश्वास ठेवावाच लागतो. १९३४ ते १९४२ या काळात ज्या नटाचं आयुष्य सर्वात बहारदार असं ठरलं ज्या कारकिर्दीमुळे ते भगवान दादा म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे त्याच माणसाने हंसते रहना या सिनेमासाठी आपली जमा पुंजी पणाला लावली. किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून या सिनेमासाठी साईन करणं ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. किशोर कुमारच्या वेगवेगळ्या नखऱ्यांमुळे हा सिनेमा सहा रिळांपेक्षा पुढे जाऊ शकला नाही आणि नंतर ती रिळंही डब्यात गेली. तर दुसरीकडे दुर्दैवाचे दशवातार पाहणं हेच भगवान यांच्या नशिबात आलं. एक काळ गाजवलेला आणि गाडी, बंगले, स्टुडिओचं ऐश्वर्य उपभोगलेला या हरहुन्नरी कलाकाराचा शेवट दादरच्या चाळीतल्या दोन खोल्यांणमध्ये झाला. असं असलं तरीही भगवान दादांना हिंदी सिनेसृष्टी विसरलेली नाही. ते त्यांच्या खास गाण्यांसाठी आणि तितक्याच उत्तम नृत्यासाठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करुन गेले आहेत.

Story img Loader