बॉलिवूडमध्ये कलाकार कायमच एकमेकांवर कुरघोडी करत असतात, एकमेकांची खिल्ली उडवत असतात. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात तर तर बॉलिवूडचे कलाकार एकमेकांवर बिनधास्तपणे टीका करतात. फिल्मफेअरसारखा पुरस्कार सोहळा हा बॉलीवूडमधील एक मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. याच पुरस्कार सोहळ्यात सैफ अली खान आणि शाहरुख खान यांनी हृतिक रोशनची खिल्ली उडवली होती. गेली अनेक वर्ष हा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. सैफ अली खान आणि शाहरुख खान हे दोघे प्रामुख्याने हा सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दिसून आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका सोहळ्यात शाहरुख खान आणि सैफ अली खान यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर टीका केली होती, यात हृतिक रोशनदेखील उपस्थित होता. सैफ मंचावरून खाली उतरला, हृतिक रोशनच्या जवळ जाऊन त्याला प्रश्न विचारला ‘बाहेरील तापमान २६ अंश आहे, हवा दक्षिणेकडून उत्तरेकडे वेगाने जात आहे तर तुझे पतंग हवेत कुठपर्यंत उडू शकते’? तेव्हा हृतिक रोशनचा काईट्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो फारसा चालला नव्हता, म्हणून मुद्दाम हा प्रश्न ह्रतिकला विचारण्यात आला होता. शाहरुखदेखील मंचावरून हृतिकला उत्तर देण्यासाठी विचारात होता. हृतिकने थोडा अंदाज घेत सैफला उत्तर दिले की ‘माझे पतंग तितकेच उडाले जितका तुझा चित्रपट कुर्बान उडाला होता’. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला होता.

“माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी डॉक्टरांनी मला सांगितले होते.. ” हृतिक रोशनने सांगितली ‘ती’ आठवण

हृतिक रोशन आणि सैफ अली खान आता आपल्याला एकाच चित्रपटात दिसणार आहेत. विक्रम वेधा या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हे दोघे एकमेकांना टक्कर देणार आहेत. मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली तर या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या या २ अभिनेत्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळणार आहे.

३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या या सगळ्यांच्या वतीने विक्रम वेधा हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When bollywood actor saif ali khan insulted hrithik roshan in filmfare event spg