सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अखेर पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात हात उचलला आणि सर्वजण थक्क झाले. या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यापूर्वीही अनेकदा क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नीवरुन खिल्ली उडवली आहे.
विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांच्यातील हा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काल झालेल्या घटनेनंतर पूर्वी झालेल्या अनेक घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यानही अशीच घटना घडली होती.
“मी चुकीचा होतो, मला…”; क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत
ऑस्कर २०१६ दरम्यानही क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा हिची मस्करी केली होती. २०१६ च्या या ऑस्कर पुरस्कारादरम्यान विल स्मिथची पत्नी जॅडाने नामांकने पसंत नसल्याने ऑस्करला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. यावर क्रिसने वादग्रस्त टीका केली होती. या ऑस्करदरम्यानचा तो व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे.
यावेळी क्रिसने ऑस्करच्या मंचावर जॅडाची खिल्ली उडवली होती. जॅडा म्हणाली की मी ऑस्करला येणार नाही. जॅडा ही ऑस्करवर अशाप्रकारे बहिष्कार टाकत आहे जशाप्रकारे मी रिहानाच्या पँटीजवर टाकतो. कारण त्या ठिकाणी मला आमंत्रण देण्यात आलेले नसते. यानंतर क्रिसने विल स्मिथची खिल्ली उडवली होती. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्राही उपस्थित होती.
दरम्यान काल झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा क्रिसचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तो जॅडा आणि विल स्मिथची थट्टा करत असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी हा वाद जुना असल्याचे भाष्य करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा काल (२८ मार्च) आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर हात उचलल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली.
सुरुवातीला चाहत्यांना वाटले की हे सर्व शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे. पण नंतर काही व्हिडीओ आले ज्यात विलही रडताना दिसत होता, ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली की हे सर्व खरोखरच घडले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथला त्याचा ऑस्कर पुरस्कार परत करावा लागू शकतो, अशीही चर्चा रंगली होती.