मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३४ वर्ष झाली आहेत. २३ सप्टेंबर १९८८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याकाळात तिकिटाचे दर कमी होते. मात्र तरीदेखील या चित्रपटाने कोटींचा व्यवसाय केला होता. आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर याच चित्रपटातील अनेक मिम्स व्हायरल होताना दिसून येतात. कोणत्याही पिढीला अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे चाहते आहेत. क्रिकेट जगतातला देव म्हणून ओळखला गेलेला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. हा चित्रपट त्याचासुद्धा आवडीचा आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. अनेक गोलंदाजांचे चेंडू त्याने सीमापार धाडले आहेत. असा हा सचिन आवर्जून चित्रपटदेखील बघतो. काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यावरदेखील चित्रपट आला होता. त्याच चित्रपटाच्या एका कार्यक्रमात खुद्द सचिन तेंडुलकर म्हणाला होता की ‘माझा आवडता चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी, असे काही चित्रपट आहेत जे तुम्ही कधी बघू शकता. हा चित्रपट अगदी कुठून ही बघू शकता, अगदी हा चित्रपट मध्यंतरापासून बघितलात तरी तुमचे मनोरंजनच होते. तुमच्याकडे जरी १० मिनिटं असतील तरी यातला कोणताही प्रसंग तुमच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जातो.’
ऑस्करच्या शर्यतीत ‘RRR’ मागे पडल्याने हॉलिवूडचे दिग्दर्शक संतापले, म्हणाले, ‘ही शुद्ध… “
सचिन तेंडुलकर स्वतः मराठी असल्याने त्याला मराठी चित्रपट, खाद्यपदार्थ यांच्याबद्दल विशेष प्रेम आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित तसेच अभिनय केलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी आणि सुधीर जोशी यासारखे मातब्बर कलाकार होते.
पुण्यासारख्या शहरात अविवाहित मित्रांना राहण्यासाठी जागा मिळत नाही म्हणून ते स्त्री वेश धारण करतात. अशा सर्वसामान्य कथा या चित्रपटाची आहे. वसंत सबनीस या ज्येष्ठ लेखकाने या चित्रपटाचे संवाद लिहले होते. ‘वारले’, ‘हा हलकट्पणा आहे’, ‘हा माझा बायकोसारखे’ संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. हिंदीत जसे प्रेक्षक ‘शोले’ चित्रपटाची आठवण काढतात त्याच धर्तीवर मराठीत ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाची आठवण काढतात.