आजही चित्रपटातील हीरोपेक्षा व्हिलनची क्रेझ प्रेक्षकांमध्ये जास्त असते. कित्येक कलाकारांनी खलनायकाची भूमिका साकारून स्वतःचं करिअर सेट केलं. असाच एक खलनायक ज्याने निगेटिव्ह भूमिकांच्या व्याख्याच बदलून टाकल्या अशा हरहुन्नरी कलाकार हिथ लेजरची नुकतीच पुण्यतिथी झाली. २२ जानेवारी या दिवशी केवळ २८ व्या वर्षी हिथने जगाचा निरोप घेतला. आजही केवळ हॉलिवूडमधीलच नव्हे तर जगभरातील सगळेच प्रेक्षक त्याची आठवण काढतात.
क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित बॅटमॅन सिरिजच्या दुसऱ्या भागात म्हणजेच ‘द डार्क नाइट’मध्ये हिथने जोकर हि महत्त्वाची भूमिका निभावली आणि यानंतर त्याने खलनायकाची भूमिका एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली, यानंतरच त्याचा ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला असं म्हंटलं जातं. हिथचं ‘जोकर’ हे पात्र साऱ्या जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंच, पण ऑस्करने सुद्धा त्याच्या पश्चात हिथला पुरस्कार देऊन एक वेगळा इतिहास रचला होता. नुकतंच भारतीय दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्याच्या स्मृतीस उजाळा दिला.
आणखी वाचा : भाईजानच्या चाहत्यांसाठी सरप्राईज; ‘पठाण’बरोबर सलमानच्या ‘या’ चित्रपटाचा टीझर होणार प्रदर्शित
२००२ च्या ‘The Four Feathers’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केलं, या चित्रपटात त्यांनी हिथ लेजरला मुख्य भूमिकेत घेतलं होतं. लेजरच्या मृत्यूआधी त्याने ज्या लोकांना संपर्क साधला त्या काही मोजक्या लोकांमध्ये शेखर कपूर हे नाव होतं. शेखर यांनी त्यांच्या दोघांमधील नात्याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. त्याच्याविषयी बोलताना शेखर कपूर म्हणाले, “हिथ आणि मी आमचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. तो मला त्याचा दुसऱ्या आईकडून असलेला भाऊच मानायचा, मला तो तशीच हाकदेखील मारायचा.”
हिथच्या मृत्यूच्या एक दिवस आधी शेखर कपूर हे त्याला एका चित्रपटासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेटणार होते, पण त्याची दिवशी थोड्यावेळाने हिथच्या मृत्यूची बातमी समोर आली. ती बातमी समोर येताच न्यू यॉर्क पोलिसांनी शेखर कपूर यांना फोन केला, कारण मृत्यूआधी हिथने शेखर कपूर यांच्याशी बोलला होता. काही कारणास्तव त्यांची मीटिंग रद्द करत असल्याचं हिथने त्यांना फोनवर सांगितलं होतं. एका मुलाखतीदरम्यान खुद्द शेखर कपूर यांनी हा किस्सा सांगितला. हीथ आणि शेखर यांचे संबंध फार जवळचे होते याचा अंदाज शेखर कपूर यांना आला होता.