आमिर खानचा ‘गजनी’ आजही आपल्याला चांगलाच लक्षात आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस या आजारावर बेतलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर लॉन्ग टर्म गारुड केलं होतं. खुद्द आमिर याच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर उतरून लोकांना खास गजनी स्टाइल हेअर कट देत होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मात्र या चित्रपटामुळे हॉलिवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक मात्र चांगलाच अस्वस्थ होता. आज तोच किस्सा जाणून घेणार आहोत.

२००५ साली मुर्गदास यांनी असिन आणि सुरिया यांना घेऊन तामीळ भाषेत ‘गजनी’काढला. जो प्रचंड गाजला आणि लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर २००८ मध्ये आमिर खानला घेऊन मुर्गदास यांनी ‘गजनी’चा हिंदी रिमेक केला आणि त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही १०० कोटी इतकी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला.

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

आणखी वाचा : “मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

आमिरचं सगळेच कौतुक करत होते, पण हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन हा मात्र या चित्रपटामुळे चांगलाच अस्वस्थ होता. गजनी हा चित्रपट २००० साली हॉलिवूडमध्ये बनलेल्या नोलनच्या ‘मेमेंटो’ या चित्रपटाशी साधर्म्य साधणारा होता आणि नोलनला याबद्दल माहिती होती. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर हे मध्यंतरी नोलनला भेटले असताना त्यांच्यात ‘गजनी’वरुन चर्चा झाली.

अनिल कपूर यांनी तो किस्सा आमिरलाही सांगितला. अनिल नोलनशी बोलत असताना नोलनने गजनीचा उल्लेख केला आणि तो चित्रपट मेमेंटोची कॉपी असल्याचंही त्याच्या कानावर आलं होतं. “चित्रपटाला एवढं यश मिळूनही माझा कुठेच उल्लेख नाही किंवा पैसेदेखील दिले नाहीत.” असं म्हणत नोलनने खेद व्यक्त केल्याचं अनिल कपूर यांनी सांगितलं.

यामुळे नोलन प्रचंड अस्वस्थ होता. ‘मेमेंटो’ हा त्याचा पहिला व्यावसायिक हिट चित्रपट होता. आपल्या भावाच्या लघुकथेवर नोलनने या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रथम कुणीच पुढे येत नव्हतं. अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतःच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं आणि २००० साली हा चित्रपट केवळ ११ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढे या चित्रपटाने इतिहास रचला.