‘बॉयकॉट बॉलिवूड’, ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हे सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होत आहे. ३ दिवसात ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खूप आधीपासून या चित्रपटाला बॉयकॉट करावा अशी विनंती सोशल मीडियावरून केली जात आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. बॉलिवूडचा घसरलेला दर्जा, कलाकारांची वक्तव्यं यामुळे बॉलिवूडवर ही परिस्थिति ओढवली असल्याचं म्हंटलं जात आहे. यावरून नेटीजन्सनी आता या चित्रपटाचा निर्माता करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या दरम्यानचा जुना वाद उकरून काढायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१६ नंतरच्या उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायला सुरुवात केली होती. याच दरम्यान करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होता. या चित्रपटात फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार महत्वाच्या भूमिकेत असल्याने यावरून चांगलाच वाद रंगला होता. सोशल मीडियावर हा चित्रपट बॉयकॉट करण्याची तेव्हाही चांगलीच चर्चा झाली.

चित्रपट पूर्ण झाला असल्याकारणाने आयत्यावेळेला पुन्हा चित्रीकरण शक्य नसल्याने करण जोहरने चित्रपट आहे तसा प्रदर्शनासाठी जोर लावून धरला. पण एकूणच सगळीकडे वातावरण तापल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. यामध्ये आता राजकीय पक्षांनीदेखील हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण जोहरबरोबर चर्चा करून एका मीटिंगमध्ये यावर तोडगा काढला. तो तोडगा म्हणजे निर्माता करण जोहरने पाकिस्तानी कलाकाराबरोबर काम केल्याप्रकरणी प्रायश्चित्त म्हणून ५ कोटी रुपये भारतीय सेनेला देणगी द्यावी. तरच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.

ठरल्याप्रमाणे करण जोहरने भारतीय सेनेला ५ कोटी रुपये देणगी म्हणून दिली. पण करणच्या या देणगीचा काही फायदा झाला नाही. भारतीय आर्मीने ती देणगी थेट नाकारली. “एका चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनकडून मिळालेली अशी देणगी भारतीय आर्मी कधीच स्वीकार करणार नाही” म्हणत भारतीय सैन्याने ते पैसे परत पाठवले.

आणखी वाचा : कंगनाचा ‘हा’ बहुचर्चित चित्रपट पुन्हा लांबणीवर; चाहत्यांना पुढच्या वर्षापर्यंत पहावी लागणार वाट

हाच किस्सा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “भारतीय आर्मी अशा कलाकारांचा बॉयकॉट करू शकते तर आपण का नाही” असं म्हणत सोशल मीडियावर पुन्हा ही घटना व्हायरल केली जात आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट येत्या ९ तारखेला प्रदर्शित होणार आहे. एकंदर या चित्रपटाला बॉयकॉट करणारे आणि पाठिंबा देणारे असे बरेच प्रेक्षक सध्या बघायला मिळत आहेत.