बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे सर्वच स्टार्स मोठेपणी यशस्वी होतात असं नाही. यातले दोन अपवाद म्हणजे दिग्गज दाक्षिणात्य कमल हासन व सारिका होय. कमल हासन यांनी सारिकाला जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हाची आठवण सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.

सारिकाचं बालपण चित्रपटांच्या सेटवर गेलं. कारण तिचे वडील ती लहान असताना सोडून गेले, त्यामुळे कुटुंब चालवायला तिच्या आईने तिला अभिनयक्षेत्रात पाठवलं. “एखाद्या सामान्य मुलासाठी लहानपणी आपल्या आई-वडिलांना गमावणं खूप वाईट असतं. कारण, त्या वयात ते त्या गोष्टीसाठी तयार नसतात. दुसरीकडे बालकलाकार म्हणून लहानपणी त्यांना अशी भावनिक दृश्ये करावी लागतात. या कामासाठी त्यांना चॉकलेट किंवा बिस्किट बक्षीस म्हणून दिले जाते. अर्थात, तेव्हाही तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य समजणार नसतं, मात्र कुठेतरी तुमच्या आत त्या भावना असतात”, असं सारिका म्हणाली होती.

हेही वाचा – बालपणी वडिलांनी सोडलं, नंतर पतीने सोडलं आता मुलीही राहत नाहीत सोबत, प्रसिद्ध अभिनेत्रीला कारमध्ये काढावे लागले दिवस

सारिका व कमल हासन यांची पहिली भेट

सारिका व कमल हासन यांची पहिली भेट १९८४ साली ‘राज तिलक’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. नंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी १९८८ मध्ये लग्न केलं. एकमेकांशी मैत्री झाली तेव्हाची आठवण सांगताना कमल हासन यांनी खुलासा केला की सारिकाने घर सोडलंय याची त्यांना कल्पना नव्हती. तसेच ती खूप मानसिक आणि आर्थिक संघर्ष करून एकटीच राहत होती.

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

वास्तव समजल्यावर मला धक्का बसला – कमल हासन

“जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती एक स्टार होती. ती कुठे राहते हे फार कमी लोकांना माहीत होतं. जेव्हा आमच्यातील जवळीक वाढली, तेव्हा तिच्याबद्दलचं वास्तव समजल्यावर मला धक्का बसला. अर्थात, मला ती आवडली होती, पण त्या आवडण्यात एक सहानुभूती होती,” असं कमल हासन म्हणाले होते. “तिला त्या सहानुभूतीची गरज नव्हती, मी जवळचा मित्र असूनही सहानुभूती दाखवल्याने तिला खूप अपमानास्पद वाटलं. तिला मदत हवी आहे का असं आम्ही तिला विचारल्यावर ती नाराज व्हायची,” असंही कमल हासन यांनी म्हटलं होतं.

Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
कमल हासन व सारिका (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा – ५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

कमल हासन यांच्या वक्तव्यावर सारिकाने प्रतिक्रिया दिली होती. “तो स्वाभिमान टिकवून ठेवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं”, असं ती म्हणाली. त्यावर “मला त्या गोष्टीचं कौतुक आहे”, असं हासन म्हणाले होते.

कमल हासन व सारिका २००४ मध्ये विभक्त झाले. या जोडप्याला श्रुती हासन व अक्षरा हासन या दोन मुली आहेत. कमल हासन यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या तमिळ चित्रपट ‘हे राम’साठी सारिकाला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Story img Loader