मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे कायमच चर्चेत असते. मराठी एकांकिकेपासून ते हिंदी चित्रपटपर्यंत तिने मजल मारली आहे. तिचा हा प्रवास मोठा आहे आणि संघर्षमयी आहे. राधिका आपटे चित्रपटांप्रमाणेच आपल्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. लवकरच तिचा’ विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील दोन स्टार हृतिक रोशन, सैफ अली खान यांच्याबरोबर ती झळकणार आहे. या चित्रपटात ती सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील ती आपली छाप सोडून जाताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार ठिकठिकाणी जात आहेत. नुकतेच या चित्रपटातील काही कलाकार कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशनच्या निमित्ताने गेले होते. तेव्हा कार्यक्रमाचा निवेदक कपिल शर्माने सुरवातीला सगळ्या कलाकारांचे स्वागत केले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा राधिका आपटेकडे वळवला. कपिल राधिकाकडे बघत म्हणाला, ‘जेव्हा नेटाफिल्क्स नुकतेच भारतात आले होते तेव्हा मी त्यामध्ये तुला इतकं बघितलं की नंतर मला असं वाटू लागलं की नेटाफिल्क्सचा लोगो म्हणजे तुझा चेहरा आहे’. हे ऐकताच सगळे हसायला लागले. कपिल पुढे म्हणाला ‘तू एवढं काम केलं आहेस तरी तुला त्याचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते का’? यावर राधिका म्हणाली नाही ‘मलादेखील ६०० रुपये भरावे लागतात’. हे ऐकताच पुन्हा प्रेक्षकांनामध्ये हशा पिकला. पुढे कार्यक्रमात कपिलने सैफ, राधिकाला आठवण दिली की त्या दोघांनी याआधीदेखील सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये एकत्र काम केलं आहे.

“नीना गुप्तांप्रमाणे मीसुद्धा दिग्दर्शकांकडे…” अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने व्यक्त केली खंत

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्येच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता माध्यमांच्या वृत्तानुसार ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहेत. विक्रम वेधा हा चित्रपट मूळ तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. मुळ चित्रपट लोकांनी भरपूर पसंत केला होता. या रिमेकच्या बाबतीतही बरीच लोकं उत्सुक दिसत आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा लूकसुद्धा लोकांना प्रचंड आवडला आहे.

३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When kapil sharma created joke on actress radhika apte in his show spg