बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. करण हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त करण नाही तर त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शो देखील तितकाच चर्चेत असतो. हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या शोमध्ये सेलब्रिटी हजेरी लावतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देतात. खरंतर या शो मध्ये करण खूप वैयक्तिक प्रश्न देखील विचारतो, यासोबत अनेकदा मजेदार प्रश्नांचा देखील भडिमार असतो. नुकताच एक व्हिडीओ शेअर करत हा ‘कॉफी विथ करण’चा ७ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या निमित्तानं जाणून घेऊयात या शोसंबंधित काही रंजक किस्से…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मानं २०१७ मध्ये कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळचा कपिल शर्माचा हा एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला होता. आपल्या कॉमेडी शोमध्ये भल्याभल्यांची विकेट घेणाऱ्या कपिल शर्मानं करण जोहरसमोर अक्षरशः हात टेकले होते. करण जोहरनं या शोमध्ये कपिल शर्माला त्याची लव्ह लाइफ, खासगी आयुष्य आणि सेक्स याविषयी बरेच प्रश्न विचारले होते. या कारणनं कपिल शर्मा सहभागी झालेला एपिसोड सोशल मीडियावर बराच चर्चेत राहिला होता.

आणखी वाचा-फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…

कपिल शर्मानं करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी करणनं त्याला लव्ह लाइफ आणि गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी तो सुरुवातीला शांत राहिला आणि नंतर त्यानं सांगितलं की त्याला यावर बोलायचं नाहीये. त्यावेळी कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नी चतरथला डेट करत होता. त्यानंतर करण जोहरनं त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणखी काही प्रश्न विचारले होते ज्याची कपिलनं फार मजेदार उत्तरं दिली होती. कपिल शर्मा उत्तरं देणं टाळतोय हे लक्षात आल्यानंतर करण जोहरनं त्याला आणखी काही प्रश्न विचारले.

आणखी वाचा- “एवढा गर्व कोणत्या गोष्टीचा…” अल्लू अर्जुनचं वागणं पाहून भडकले लोक

कपिल शर्मानं जेव्हा गर्लफ्रेंडचं उत्तर देणं टाळलं तेव्हा करण त्याला म्हणाला, “तुझी गर्लफ्रेंड नाही मग तू सेक्ससाठी काय करतो?” करण जोहरच्या या प्रश्नावर मात्र कपिल शर्माची बोलतीच बंद झाली. सुरुवातीला त्यानं काही बोलण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर तो शांतच बसला. तो म्हणाला हा कॉफी विथ करण शो आहे की समथिंग एल्स विथ करण शो आहे. कपिल शर्मा स्पेशल हा एपिसोड बराच चर्चेत होता. दरम्यान ७ जुलै पासून ‘कॉफ विथ करण’ डिस्नी प्सल हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.