अभिनेत्री करीना कपूर,सैफ अली खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडपं. ‘टशन’ चित्रपटापासून दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. प्रेमाचे रूपांतर खरे लग्नात झाले. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडील आहेत. करीनाने लग्नानंतरदेखील आपले करियर सुरु ठेवले आहे. नुकतीच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात ती दिसली होती. सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोघे आपलयाला करियर प्रमाणे आपल्या खाजगी आयुष्यात एकमेकांना वेळ देतात. करीनाने सैफ अली खानच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

या जोडीला प्रेक्षकांनी पडद्यावर पसंत केले आहे, मात्र त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. कपिल शर्माच्या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी येत असतात. याच कार्यक्रमात करीना कपूरने आपली हजेरी लावली होती. तेव्हा कपिल शर्माने तिला प्रश्न विचारला की, ‘मागे आमच्या कार्यक्रमात सैफ अली खान आला होता तेव्हा तो असं म्हणाला की करीना माझे खूप मनोरंजन करते. डॉन चित्रपटात तिने जो डान्स केला होता तशाच पद्धतीचा डान्स ती माझ्यासाठी करते, अगदी त्यात जशी वेशभूषा होती तशीच वेशभूषा ती करते’. कपिलच्या या प्रश्नावर करीनाने लाजत उत्तर दिले, ‘तो काहीही बोलतो या सगळ्या खाजगी गोष्टी आहेत. मला माहित नाही तो असा कसा काय बोलू शकतो’? त्यावर कपिल म्हणाला ‘डान्स करण्यात काय प्रॉब्लेम आहे’? त्यावर करीना म्हणाली ‘डान्स करण्यात गैर नाही मात्र तो डान्स मी खास त्याच्यासाठी केला होता या सगळ्या गोष्टी आमच्या खाजगी आहेत. मला त्याला मारायची इच्छा होत आहे’. ‘डॉन’ या शाहरुख खानच्या चित्रपटात तिने एक आयटम गाणे केले होते. ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अभिनेता अजय देवगण बरोबर या कार्यक्रमात आली होती.

आणखीन वाचा :विक्रम वेधा’बाबत केआरकेने केलेलं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “हृतिकने अमिताभ यांची…”

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी उघड करताना दिसून येतात. सैफ अली खानचे करीना कपूरशी लग्न होण्याआधी अमृता सिंग या अभिनेत्रीशी लग्न झाले होते. इब्राहिम, सारा अशी दोन मुलेदेखील त्यांना आहेत. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर त्याने करीनाशी लग्न केले.

करीना आणि सैफ अली खान यांनी LOC कारगिल (२००३) आणि ओंकारा (२००६) मध्ये एकत्र काम केले होते. करीनाने सैफच्या नावाचा एक टॅटूदेखील आपल्या हातावर काढला होता. करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.

Story img Loader