बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खानची आहे. करीना आणि तिची सासू अभिनेत्री शर्मिला टागोर यांची जोडी देखील तितकीच लोकप्रिय आहे. शर्मिला टागोर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. ‘What Women Want With Kareena Kapoor Khan’ या शो मधील त्यांची मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यात शर्मिला टागोर यांनी पतौडी कुटुंबाबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा केली.

शर्मिला या करीना बद्दल बोलल्या ती खूप चांगली आहे. ती तिच्या स्टाफला आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास देत नाही. त्यांनी त्यांच्या सुनेचे कौतुक केले. “मला तुझ्यात असलेल सातत्य आवडतं. तू नेहमी संपर्कात राहतेस तुझी ती पद्धत मला आवडते. कारण मला माहित आहे की जर मी तुला मेसेज केला तर तू मला लगेच उत्तर देशील दुसरीकडे सैफ आणि सोहा हे त्यांना वेळ मिळेल तेव्हा उत्तर देतात,” असे शर्मिला म्हणाल्या.

करीनाबद्दल शर्मिला पुढे म्हणाल्या, “जर मी घरी येत असेल तर तू मला विचारतेस की जेवाणात काय खाणार आणि मला पाहिजे तेच मला मिळतं. हे कपूरांचे वैशिष्ट्य असेल कारण तू खूप छान टेबल लावतेस.”

शर्मिला यांनी पुढे त्यांचे पती मंसूर अली खान पतौडी यांच्या निधनाबद्दल सांगितले. दुसऱ्या दिवशी करीनाचा वाढदिवस होता तरी करीना संपूर्ण कुटुंबासोबत रुग्णालयात थांबली. “मी तिला पाहिलं आहे, आणि ती खरचं आश्चर्यकारक आहे.”

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

२०११ मध्ये मंसूर अली खान यांचे निधन झाले त्यावेळी करीना पतौडी कुटुंबासाठी आधारस्तंभ म्हणून होती. या विषयी शर्मिला म्हणाल्या, “माझी मुलं आणि माझं कुटुंब ज्या प्रमाणे माझ्यासोबत होतं त्या प्रमाणे बेबो देखील माझ्यासोबत होती.” दरम्यान, २०१२ मध्ये करीना आणि सैफ यांनी लग्न केले.