बॉलीवूडमधली एकेकाळची प्रसिद्ध जोडी म्हणजे सलमान-कतरिना. मात्र, या जोडीचे प्रेमप्रकरण जास्त दिवस टिकू शकले नाही. आता जरी हे दोघे पूर्वाश्रमीचे प्रियकर म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्यातील मैत्रीचे संबंध अद्याप तसेच आहेत. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कोणताही राग नाही. याचीच प्रचिती आली ती जेव्हा कतरिनाने सलमानकडे मदतीसाठी हात मागितला त्यावेळेस..
कतरिना सध्या फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणादरम्यान तिला काही समस्यांना सामोरे जावे लागले. रंगभूषाकार डॅनियल बॉयर हे भारतीय नसल्याने तसेच वेशभूषा आणि रंगभूषाकार असोसिएशनच्या सदस्य नसल्याने असोसिएशनच्या सदस्यांनी चित्रपटाच्या सेटवर जाऊन बॉयर यांच्याविरोधात निषेध नोंदवून काम करण्यास नकार दिला. त्यावेळी डॅनियलसोबत काम करताना अडथळा आलेल्या कतरिनाने सलमानला फोन करून त्याच्याकडून सल्ला मागितला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानचा (भाई) फोन आल्यावर सदर निषेध लगेचच थांबविण्यात आला.

Story img Loader