बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून अजूनही इशा कोपिकरला ओळखलं जातं. ईशाने ‘एक था दिल एक थी धडकन’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ चित्रपटातील ‘खल्लास’ या आयटम नंबरने मात्र तिच्या कारकिर्दीला वेग मिळाला आणि चित्रपटसृष्टीमध्ये तिला ‘खल्लास गर्ल’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ईशाने ४६ वर्षात पदार्पण केलं आहे. २००६ च्या एका मुलाखतीमध्ये इशा कोपिकर तिच्या ‘खल्लास गर्ल’ची तुलना थेट हेमा मालिनी यांच्या ‘ड्रीम गर्ल’शी केली होती. ज्याप्रमाणे एका पोस्टरमुळे हेमा मालिनी यांना ‘ड्रीम गर्ल’ हे नाव पडलं आणि त्यांनी योगायोग म्हणजे त्यांनी त्याच नावाच्या चित्रपटातही काम केलं. आपल्याही बाबतीत तसंच काहीसं घडलं असल्याचं इशाने सांगितलं आहे.

इशा म्हणते, “मला कधीच माझ्या ‘खल्लास गर्ल’ इमेजचा कंटाळा येणार नाही. या गाण्याने मला ओळख मिळवून दिली, शिवाय चित्रपटसृष्टीतही मला याच गाण्यानंतर ओळखलं जाऊ लागलं. मला मिळालेलं ‘खल्लास गर्ल’ हे बिरुद हेमा मालिनी यांना मिळालेल्या ‘ड्रीम गर्ल’ या बिरुदाइतकं अभिमानास्पद आहे.”

आणखी वाचा : केआरकेला ‘आरएसएस’मध्ये यायचं आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवतांकडे केली विंनती

इशाने बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे, हिंदी चित्रपटात ती बहुतेकवेळा आयटम नंबर्समध्येच दिसली. पण याबरोबच तिला एखाद्या चित्रपटात अभिनय करायला आवडेल असंही तिने स्पष्ट केलं आहे. इशा आता ‘लव्ह यु लोकतंत्र’ या चित्रपटात झळकणार आहे. याबरोबरच ‘सुरंगा’ नावाच्या एका वेबसीरिजमध्येही तीची वेगळी भूमिका आपल्याला बघायला मिळणार आहे.