बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. मात्र, एकदा केआरकेने कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल केल्यामुळे नाही तर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खानवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे चर्चेत होता.
जवळपास १० वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी २०१२ मध्ये केआरकेने ट्विटरवर त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. केआरकेने ‘सपना बाबुल का…बिदाई’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सारा खान हिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. “हे अधिकृत आहे की काल मी माझ्या मोरोक्कन गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केला, पण आज मी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खानच्या प्रेमात आहे,” असे ट्वीट केआरकेने केले होते.
आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…
डेली भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, केआरकेने हे विधान केल्यानंतर लगेचच सारा म्हणाली, “केआरकेच्या ट्वीटबद्दल ऐकून मला धक्का बसला. मी टेक-सॅव्ही नाही, त्यामुळे त्याने नेमके काय लिहिले ते मी अजून तपासले नाही. गेल्या दोन दिवसांपासून माझा फोन सतत वाजत आहे. त्यामुळे मी अस्वस्थ झाले आणि प्रत्येक व्यक्ती मला या विषयी विचारत आहे. मी त्याला त्याच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने उत्तर दिले नाही.”
आणखी वाचा : लेकीचे केस पांढरे का? दिलीप जोशी म्हणाले…
सारा पुढे म्हणाली, तिने तिच्या पीआरला केआरकेला उत्तर देण्यास सांगितले, त्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले होते की “केआरके जर तुझे सारावर खरोखर प्रेम असेल, तर ट्वीटरवर अशा गोष्टी लिहिण्याऐवजी, एका पुरुषासारखा…तिच्या समोर जाऊन तिला प्रपोज कर.”