नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेल्या ‘दिल’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने हातात हॉकी स्टीक घेऊन अभिनेता आमीर खानचा पाठलाग केला होता. यामागचे गुपीत माधुरीने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारताना उघड केले आहे. आयुष्यात केलेली सर्वात खट्याळ घटना कोणती? या प्रश्नाच्या उत्तरात बोलत असताना माधुरीने ‘दिल’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचा प्रसंग कथन केला. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीर खानने माझ्यासोबत एक ‘प्रँक’ केला होता. म्हणून मी रागात हातातली हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे धावत सुटले होते, अशी माधुरीने प्रांजळ कबुली दिली.

माधुरीने १९८४ साली बंगाली अभिनेता तपास पौलसोबत ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलीवूडमधील करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलग काही चित्रपट आपटल्यानंतर माधुरीने ‘तेजा’ब चित्रपटातून दमदार पुनरागमन केले आणि स्टारडम प्राप्त केले. त्यानंतर ‘राम लखन’, ‘परिंदा’ असा तिचा आलेख वाढता राहिला.

अभिनेत्री म्हणून करिअर घडवताना तुझा आदर्श कोण होतं? या प्रश्नाच्या उत्तरात माधुरीने कोणा एका अभिनेत्रीचे नाव घेणे टाळले. बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री माझ्यासाठी प्रोत्साहन ठरल्या आहेत. जेव्हा जेव्हा मी एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे चांगले काम पाहत असे, त्यातून मला आणखी काम करण्याचे प्रोत्साहन मिळत असे. त्यामुळे एका विशिष्ट व्यक्तीचे मी नाव घेऊ शकत नाही. माझ्याकाळातील सर्वच अभिनेत्री मला आदर्श होत्या. याशिवाय, सध्याच्या पिढीतील तरुण अभिनेत्री देखील माझ्यासाठी आदर्शच आहेत, असेही माधुरी पुढे म्हणाली.

Story img Loader