बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मिस्टर इंडिया म्हणून सगळ्यांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते अनिल कपूर हो बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक असून त्यांनी ९०चे दशक गाजवले होते. माधुरी आणि अनिल कपूर एका चित्रपटात म्हणजे त्यांचा चित्रपट हा सुपरहिट होणार असं समीकरण आधी पासून होतं. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हे दोघे खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र होते. मात्र, एवढी प्रसिद्धी मिळूनही माधुरीने अनिल कपूर सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

माधुरीने असा निर्णय का घेतला? काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या दोघांचं नातं हे मैत्री पेक्षा जास्त असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. माधुरी आणि अनिल कपूर एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, हे सगळं एकदिवस अचानक थांबलं.

एके दिवस अनिल कपूर यांची पत्नी सुनिता मुलांना घेऊन सेटवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी माधुरी तिथून जातं असताना तिने अनिल कपूरला त्याच्या कुटुंबाशी बोलताना पाहिलं. त्याचवेळी माधुरीने अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

माधुरीने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं. मी अशी कोणतीच गोष्ट करणार नाही ज्यामुळे अनिल कपूरच्या कुटुंबावर त्याचा प्रभाव पडेल. माधुरी आणि अनिल कपूरमध्ये मैत्रिला वगळता कोणतंच नातं नाही असं स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

त्यानंतर १७ वर्षांनंतर २०१९ मध्ये ‘टोटल धमाल’ या चित्रपटासाठी माधुरी आणि अनिल एकत्र आले होते. या आधी त्यांनी २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुकार’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

Story img Loader