Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक उमदा कलाकार गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. चित्रपटांबरोबरच नितीन देसाई यांनी राजकीय नेत्यांच्याही बऱ्याच कार्यक्रमांसाठी काम केलं.
खासकरून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातही नितीन देसाई यांनी बरंच काम केलं. ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात नितीन देसाई यांनी गेल्यावर्षी हजेरी लावली त्यादरम्यान त्यांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. गेल्या काही वर्षात नितीन देसाई यांनी मोदींसाठी जवळपास ८७ कार्यक्रम केले. ‘जीएसटी’चं लॉंच त्यांनी केलं, स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या लॉंचचं काम नितीन देसाई यांच्याकडेच होतं.
आणखी वाचा : नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी शोकाकुल; गश्मीर महाजनीनेही पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली
याच मुलाखतीमध्ये नितीन देसाई यांनी २००३ दरम्यान मुंबईमध्ये मोदींसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाबद्दल भाष्य केलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, “तो मोदींसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कार्यक्रम होता. विनोद तावडे यांनी त्यावेळी ही सगळी लॉंचिंगची जवाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्यांच्याकडे तेव्हा यासाठी फारशी कल्पना नव्हती. त्यावेळी माझ्याकडे एक ८० फुटाचं कमळ होतं, त्याचा मी वापर केलेला. त्यावेळी मी दिलेली संकल्पना ऐकून सगळेच यासाठी उत्सुक होते. तेव्हा मी प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्याबरोबर काम केलं.”
आणखी वाचा : मुंबईत हुबेहूब हिमाचल प्रदेश उभं करणारे नितीन देसाई काळाच्या पडद्याआड; ‘या’ चित्रपटाने मिळवून दिलेली ओळख
पुढे ते म्हणाले, “मी त्यावेळी मोदीजींना त्या ८० फुटाच्या कामळाच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केलं, मागे मोठ्या स्क्रीनवर त्यांच्या राजकीय प्रवासाची क्लिप दाखवली जात होती. जेव्हा मोदीजी त्या कामळातून बाहेर आले आणि त्यांनी अडीच लाख जनसमुदायासमोरत्यांच्या खास शैलीत जबरदस्त भाषण दिलं. त्यावेळी मोदीजी भाषणादरम्यान म्हणाले, की इथे उपस्थित असलेले एक लाख लोक हे नरेंद्र मोदी यांना भेटायला आले आहेत तर दीड लाख लोक ही माझे मित्र नितीन देसाई यांनी बनवलेला हा भव्य मंच बघण्यासाठी आले आहेत.”
नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. एखाद्या चित्रपटाचं ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात नितीन देसाई यांचा सिंहाचा वाटा होता.