बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी दीवार, अमर अकबर अँथनी, खेल खेल में, याराना अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची जोडी आजही पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दरम्यान, नीतू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ऋषी कपूर हे चांगले किसर नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

याची आठवण करून देताना नीतू म्हणाल्या, ‘सागर’ चित्रपटादरम्यान ऋषी आणि डिंपल कपाडिया यांच्यात काही किसींग सीन होते. यावर नीतू यांची कशी प्रतिक्रिया असेल याची चिंता ऋषी कपूर यांना सतावत होती. त्यांना वाटले की नीतू यांना हे आवडणार नाही.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

चित्रपट पाहिल्यानंतर नीतू म्हणाल्या, ऋषींना माहित होते की चित्रपट पाहिल्यानंतर मी त्यांना काही तरी बोलेन, त्यामुळे चित्रपट पाहताना ते माझ्या चेहऱ्यावर काय हावभाव आहेत त्याकडे पाहत होते. त्यानंतर काही न बोलता ऋषी गाडीत बसले, मग मी त्यांच्याकडे वळून म्हणाले, बॉब, मला तुझी खूप लाज वाटते. तू इतका वाईट किसर कसा असू शकतोस? ऑनस्क्रिन चांगला किसर असशील याची मला अपेक्षा होती.

आणखी वाचा : The Ghost Teaser: नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

नीतू या त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी अभिनय क्षेत्र सोडले आणि त्यांनी ऋषी यांच्याशी लग्न केले. त्यावेळी नीतू या फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या घर आणि त्यांची दोन्ही मुलं रिद्धिमा आणि रणबीरला सांभाळू लागल्या. ऋषी यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ चित्रपटावेळी, नीतू यांनी खुलासा केला होता की त्यांना ऋषी कपूरच्या सहकलाकारांची काळजीत वाटते, तर एकदा त्या ऋषी यांच्या ऑनस्क्रिन किसिंग विषयी वक्तव्य केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When neetu kapoor told husband rishi kapoor a bad kisser actress said i am ashamed of you dcp