मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे. गेली १० वर्षे अंबानी कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. मुकेश आणि नीता अंबानी हे ८ मार्च १९८५ ला विवाहबंधनात अडकले. नीता आणि मुकेश अंबानी यांचं लग्न जुळवण्यात सर्वात मोठं योगदान हे मुकेश यांचे वडील आणि उद्योजक धीरूभाई अंबानी यांचं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश आणि नीता अंबानी यांचं जरी अरेंज्ड मॅरेज असलं तरी मुकेश अंबानी यांनी अत्यंत फिल्मी स्टाइलमध्ये नीता अंबानी यांना प्रपोज केलं होतं. खुद्द नीता अंबानी यांनीच हा किस्सा अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या एका ‘टॉक शो’मध्ये सांगितला होता. मुकेश अंबानी यांनी नीता यांना प्रपोज केलं याचं उत्तर त्यांनी या मुलाखतीमध्ये दिलं.

आणखी वाचा : मुकेश अंबानी नीता अंबानींना ‘डेट’वर कुठे घेऊन जातात माहित्ये का?

नीता म्हणाल्या, “मुंबईच्या पेडर रोडवर आम्ही रात्री ८ च्या सुमारास एका कारमधून जात होतो. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होता. त्याच सगळ्या ट्रॅफिकमध्ये मुकेश यांनी गाडी थांबवली अन् मला विचारलं की ‘माझ्याशी लग्न करशील का?’ त्या वेळी मी अशा कोणत्या प्रश्नासाठी तयारच नव्हते. आमच्या आजूबाजूला प्रचंड गोंधळ होता, मागच्या गाडीतील लोक हॉर्न वाजवत होते, ओरडत होते. मी मुकेश यांना पुढे जायची विनंती केली, पण ते म्हणाले, ‘मला हो की नाही यापैकी एक उत्तर दे.’ यानंतर बऱ्याच वेळाने जेव्हा नीता अंबानी यांनी होकार दिला तेव्हा मुकेश यांनी गाडी तिथून पुढे नेली.”

आणखी वाचा : पहिल्या स्मृतिदिनानिमित्त केकेला वाहण्यात आली अनोखी आदरांजली; ‘या’ ठिकाणी बांधला पुतळा

नीता अंबानी यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर १५ दिवसांतच मुकेश यांनी अशा फिल्मी स्टाइलमध्ये त्यांना प्रपोज केलं होतं. मुकेश अंबानी यांच्या आई-वडिलांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नीताला नृत्य करताना पाहिलं होतं तेव्हाच त्यांनी नीता यांना आपल्या घरची सून करून घ्यायचं ठरवलं होतं. जर त्या दिवशी कारमध्ये नीता अंबानी यांनी नकार दिला असता तर मुकेश यांनी काय केलं असतं, या प्रश्नावर मुकेश म्हणाले, “मी तिला तिच्या घरांपर्यंत सुखरूप सोडलं असतं आणि तिच्याशी चांगली मैत्री ठेवली असती.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When nita ambani shares how mukesh ambani proposed her in mumbai traffic avn